Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत दम्याचा त्रास फार का वाढतो? त्रास झाला तर काय उपाय करायचे? अभ्यास सांगतात..

थंडीत दम्याचा त्रास फार का वाढतो? त्रास झाला तर काय उपाय करायचे? अभ्यास सांगतात..

Asthma get worse in Cold अस्थमाच्या रुग्णांसाठी थंडीचे दिवस खूप त्रासदायक ठरतात. वातावरणातील प्रदूषण वाढल्याने दम्याचा झटका येण्याचा धोका आणखी वाढतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 06:11 PM2023-01-06T18:11:41+5:302023-01-06T18:12:43+5:30

Asthma get worse in Cold अस्थमाच्या रुग्णांसाठी थंडीचे दिवस खूप त्रासदायक ठरतात. वातावरणातील प्रदूषण वाढल्याने दम्याचा झटका येण्याचा धोका आणखी वाढतो

Why does asthma get worse in the cold? What to do in case of trouble? Studies say.. | थंडीत दम्याचा त्रास फार का वाढतो? त्रास झाला तर काय उपाय करायचे? अभ्यास सांगतात..

थंडीत दम्याचा त्रास फार का वाढतो? त्रास झाला तर काय उपाय करायचे? अभ्यास सांगतात..

अस्थमा म्हणजेच श्वास घेण्यास अडचण होणे. बऱ्याचदा अस्थमाग्रस्त लोकांना धुक्याचा प्रचंड त्रास होतो. मुख्य म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात त्यांना अधिक त्रास होतो. हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक बळावतो. त्यामुळे अस्थमा असलेल्या लोकांनी हिवाळ्यात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं.

वर्ल्ड अस्थमा फाउंडेशनच्या मते, भारतातील 25 टक्के लोकसंख्येला प्रदूषणाची एलर्जी आहे. यापैकी पाच टक्के लोकांना होणाऱ्या ऍलर्जीचे रूपांतर दम्यामध्ये होते. एका अहवालानुसार, देशात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे ५७ टक्के रुग्णांमध्ये दम्याची लक्षणे आढळून आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2019 मध्ये 26 कोटी 20 लाख लोकांचा मृत्यू दम्यामुळे झाला आहे.

थंडीत का वाढते अस्थामाच्या रुग्णांमध्ये वाढ

अस्थमाच्या रुग्णांनी कोणत्याही बदलत्या हवामानात, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात थंड आणि कोरडे वारे वाहतात. अशा परिस्थितीत जुन्या रुग्णांमध्ये दम्याचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो, यासह नवीन रुग्णही थंडीत जास्त दिसून येतात.

आकडेवारीनुसार, भारतात सुमारे सहा कोटी लोक दम्यामुळे मृत पावतात. एवढेच नाही तर देशात अस्थमाच्या रुग्णांची संख्या दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढत जात आहे. 

हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या नळ्या आखडतात, यासह वातावरणातील धुके खालच्या पृष्ठभागावर प्रदूषण ठेवते. अशा स्थितीत धुक्यात दीर्घकाळ राहिल्याने अस्थमाच्या रुग्णांमध्ये छातीत जंतुसंसर्ग आणि अस्थमाचा झटका येण्याचा धोका वाढतो. याने दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांनी ग्रस्त लोकांचा त्रास वाढू लागतो.

दमाचा झटका आल्यावर काय करावे

विलंब न करता डॉक्टरांनी सांगितलेले औषधे घ्यावे. इनहेलरचा वापर करावा.

सरळ उभे राहून किंवा बसून दीर्घ श्वास घ्यावा.

अशा स्थितीत कपडे सैल परिधान करावे, शक्य असल्यास आरामदायक कपडे घाला.

मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

डॉक्टरांशी संपर्क साधावा. उशीर न करता जवळच्या रुग्णालयात भेट देऊन उपचार घ्यावे.

Web Title: Why does asthma get worse in the cold? What to do in case of trouble? Studies say..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.