Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटात सतत आग-जीव कासावीस होतो? पाण्यात मिसळा १ पांढरी गोष्ट; तज्ज्ञ सांगतात- उष्णतेच्या त्रासासाठी उपाय

पोटात सतत आग-जीव कासावीस होतो? पाण्यात मिसळा १ पांढरी गोष्ट; तज्ज्ञ सांगतात- उष्णतेच्या त्रासासाठी उपाय

Why Does My Stomach Burn? 1 Detox Water for Stomach Health : रात्री जेवलं की पोट डब्ब, गॅसेसचा त्रास होत असेल तर, डिटॉक्स वॉटर पिऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 03:04 PM2024-05-02T15:04:27+5:302024-05-02T18:20:21+5:30

Why Does My Stomach Burn? 1 Detox Water for Stomach Health : रात्री जेवलं की पोट डब्ब, गॅसेसचा त्रास होत असेल तर, डिटॉक्स वॉटर पिऊन पाहा..

Why Does My Stomach Burn? 1 Detox Water for Stomach Health | पोटात सतत आग-जीव कासावीस होतो? पाण्यात मिसळा १ पांढरी गोष्ट; तज्ज्ञ सांगतात- उष्णतेच्या त्रासासाठी उपाय

पोटात सतत आग-जीव कासावीस होतो? पाण्यात मिसळा १ पांढरी गोष्ट; तज्ज्ञ सांगतात- उष्णतेच्या त्रासासाठी उपाय

सकाळी लवकर उठलात, तर दिवस आनंदात जातो (Stomach Health). म्हणूनच सकाळी वॉकला जाणं, सकस आहार घेणं, व्यायाम आणि योगासना करणं, यासह इतर हेल्दी गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न वडीलधाऱ्यांचा असतो (Detox Water). हेल्थबद्दल चार गोष्टी आपल्याला सांगत असतात. आरोग्यदायी सवय लावत असतात. यापैकीच एक आरोग्यदायी सवय म्हणजे, सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स पाणी पिणं. बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस आपण मसालेदार अन्न खातो. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे पोटाचे विकार वाढतात.

यासंदर्भात, 'नोएडास्थित 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक कपिल त्यागी यांनी पारंपारिक डिटॉक्स वॉटरबद्दल माहिती शेअर केली आहे. हे डिटॉक्स वॉटर चवदार असण्यासोबतच, पोटालाही थंड ठेवते. ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर जड वाटत नाही. यात बडीशेप आणि खडीसाखरेचा वापर होतो. ज्यामुळे चवीसोबत आरोग्यही सुदृढ राहते(Why Does My Stomach Burn? 1 Detox Water for Stomach Health).

खडीसाखर खाण्याचे फायदे

काकडी, नारळ पाणी आणि पुदिनाप्रमाणे खडीसाखर देखील उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. यात अनेक पौष्टीक घटकांचा समावेश आहे. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो ॲसिड आढळते. जे शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतात. योग्य प्रमाणात खडी साखर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारणे, उर्जा वाढणे, शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढणे, यासह इतर फायदे शरीराला मिळतात. यासह डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

पाण्याच्या बाटल्या आतून पिवळ्या, बाहेरून चिकट झाल्या? चमचाभर मिठाचा उपाय; बाटली होईल स्वच्छ

बडीशेप खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर आपण चमचाभर बडीशेप खातो. जे श्वासाची दुर्गंधी तर दूर करतेच, शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. बडीशेपमध्ये सेलेनियम नावाचे पोषक तत्व असते, जे शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करते. शिवाय चमकदार त्वचा, आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारणे इत्यादींसाठी फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे, याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, आम्लपित्त इत्यादी समस्या छळत नाहीत. शिवाय हे अन्नातून पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

डिटॉक्स वॉटर कसे तयार करायचे?

लागणारं साहित्य

२ टेबलस्पून बडीशेप

१ टेबलस्पून खडीसाखर

पाणी

डिटॉक्स वॉटर करण्याची पद्धत

डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

- एका ग्लासमध्ये २ टेबलस्पून बडीशेप घाला. नंतर त्यात १ टेबलस्पून खडीसाखर घाला.

- नंतर ग्लास पाण्याने भरा, आणि बंद करा. रात्रभर साहित्य पाण्यात भिजत राहूदे.

- दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या, आणि रिकाम्या पोटी प्या. 

Web Title: Why Does My Stomach Burn? 1 Detox Water for Stomach Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.