Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? ३ सोपे उपाय, पोटातली गडबड होईल बंद...

पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? ३ सोपे उपाय, पोटातली गडबड होईल बंद...

Why Does My Stomach Make Gurgling Fart Noises? : पोटात गुडगुड आवाज नेमका कशाने येतो, हा काही आजार की आजाराची लक्षणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 09:40 AM2023-06-18T09:40:00+5:302023-06-18T09:40:01+5:30

Why Does My Stomach Make Gurgling Fart Noises? : पोटात गुडगुड आवाज नेमका कशाने येतो, हा काही आजार की आजाराची लक्षणं?

Why Does Stomach Make Noises? How to stop stomach growling 3 solutions | पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? ३ सोपे उपाय, पोटातली गडबड होईल बंद...

पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? ३ सोपे उपाय, पोटातली गडबड होईल बंद...

आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. काहींना तर पोटाच्या या बारीक - सारीक समस्या कायम वरचेवर होतंच असतात, त्यामुळे त्यांना हे रोजचे सवयीचे आहे असेच वाटते. परंतु वारंवार होणाऱ्या या पोटाच्या तक्रारींकडे सतत दुर्लक्ष करणे योग्य नाही. काहींना पोटदुखी, पोटात मुरडा मारणे, पोटांत गॅस तयार होणे, पोट कायम फुगलेले वाटणे, पोटातून गुडगुड असा आवाज येणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. अनेकदा अनेकांच्या पोटातून गुडगुड आवाज येत असतो. अशा स्थितीत भूक लागल्याने हा प्रकार येत असल्याचा अनेकांचा समज असतो. मात्र, कधी कधी हा आवाज थांबत नाही. शरीराला अन्न दिल्यानंतरही पोटातून गुडगुड आवाज येत राहतो. अशा परिस्थितीत, या आवाजाकडे दुर्लक्ष करु नका. 

पोटातून काही वेळा गुडगुड असा आवाज येतो. वैद्यकीय भाषेत याला स्टोमॅक ग्रोलिंग (stomach growling) असे म्हणतात. अन्न जेव्हा लहान आतड्यात जाते तेव्हा अन्नपोषणाकरिता शरीरात विशिष्ट प्रकारचे एंजाइम तयार होत असते. त्यामुळे पचनाच्या प्रक्रियेवेळी अन्न आणि पाण्यामुळे असा आवाज येतो. आजकाल सामान्यत: प्रत्येक तिसर्‍या किंवा चौथ्या व्यक्तीला पोटाचे त्रास होतातच. अनेक रोगांची सुरूवात ही पोटातून होते. जर आपले पोट बरोबर असेल तर आपण निरोगी आहात, जर आपले पोट खराब असेल तर आपण काहीच करू नये असे वाटते. काही विशेष तज्ज्ञांच्या मते, पोटातून आवाज येण्यामागे पुष्कळ कारणे असू शकतात. पोटातूट गुडगुड असा आवाज येण्यामागे नेमकी कोणती अशी कारणे आहेत ते पाहूयात(Why Does Stomach Make Noises? How to stop stomach growling 3 solutions).

पोटातून गुडगुड असा आवाज येण्यामागे नेमकी कारण कोणती आहेत ? 

१. भूख लागणे :- बराच काळ भूक लागल्यानंतरही पोटातून गुडगुड असा आवाज येतो. यामागचे कारण असे की रिकाम्या पोटी आपली पाचक प्रणाली खाण्याशिवाय काम करत राहते. यामुळेच पोटातील ग्रंथी एकत्र होतात. रिकाम्या पोटामुळे तेथे असलेला वायू आणि पाचक घटकांमुळे आवाज निर्माण होतात.  यासाठी जास्त काळ उपाशी राहू नये,असा सल्ला आपल्याला दिला जातो. रिकाम्या पोटामुळे आपल्याला असे आवाज येत असल्यास, लगेच काहीतरी खावे. दोन जेवणांमधील दीर्घ अंतरामुळेही अशी पोटातून आवाज येण्याची समस्या उद्भवते. जास्त काळ उपाशी राहिल्यानंतर जेव्हा जेवण करता तेव्हा पचन क्रिये मध्ये त्रास जाणवतो. यामुळे पोटातून आवाज येतात. म्हणून नाश्ता आणि दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान खूप लांब अंतर असू नये. 

जेवणानंतर वारंवार पोट फुगते ? आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात सोपे उपाय...

२. गॅसची समस्या :- जर, आपल्याला गॅसची समस्या असेल, तर पोटातून गुडगुड असा आवाज येणे सामान्य गोष्ट आहे. आतड्यात गॅस साठतो, तेव्हा असे होते. या दरम्यान अनेक वेळा पोटातून गुडगुड असा आवाज येऊ लागतो. गॅस पास झाला तर, हे आवाज बंद होतात. ही समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

गॅसच्या त्रासानं पोट डब्ब होतं? रोजच्या जेवणात ४ पदार्थ खा, गॅस-ब्लोटींगचा त्रासच होणार नाही...

३. आतड्यांसंबंधी अडथळा :- आतड्यांमधील अडथळ्यांमुळे पोटात गुडगुड असा आवाज येतो. यासोबतच तीव्र पोटदुखी, फुगणे, बद्धकोष्ठता किंवा उलट्या यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर...

गुडगुड आवाज थांबवण्यासाठी काय करावे?

१. अधिकाधिक पाणी प्यावे. पोटदुखी थांबवण्यासाठी एक ग्लास पाणी गुणकारी मानलं जातं. पाणी भरण्यासोबतच ते पचनासही मदत करते.

२. पोट रिकामे असताना गुडगुड आवाज येतो असं मानलं जातं. अशा स्थितीत लगेच काहीतरी खावे. खाल्ल्याने हा आवाज थांबू शकतो.

३. यासोबतच पुदिना, आले आणि बडीशेप यापासून बनवलेला हर्बल चहा तुमच्या पचनाला मदत करू शकतो आणि तुमच्या आतड्यांसंबंधी स्नायूंना आराम देऊ शकतो.

Web Title: Why Does Stomach Make Noises? How to stop stomach growling 3 solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.