Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

Why drinking warm water with honey can be harmful for you as per Ayurveda अनेकजण कोमट पाण्यात मध घालून ते पाणी रोज सकाळी पितात, पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 05:00 PM2023-05-05T17:00:52+5:302023-05-05T17:01:34+5:30

Why drinking warm water with honey can be harmful for you as per Ayurveda अनेकजण कोमट पाण्यात मध घालून ते पाणी रोज सकाळी पितात, पण..

Why drinking warm water with honey can be harmful for you as per Ayurveda | वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

मध खाद्यपदार्थातील एक प्रकार आहे. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासह त्वचा व केसांसाठी देखील उपयुक्त ठरते. मधात जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि अमीनो एसिडस् यासह विविध पौष्टिक घटक असतात. काही लोकं वजन कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून पितात. पण हे पेय शरीरासाठी घातक ठरू शकते.

आरोग्य प्रशिक्षक डॉ. वरलक्ष्मी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी आयुर्वेदानुसार मध आणि गरम पाणी हे चुकीचे मिश्रण असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ''मध गरम पाण्यात मिसळल्याने शरीरात टॉक्सिन जमा होण्यास सुरुवात होते. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते''(Why drinking warm water with honey can be harmful for you as per Ayurveda).

मध आणि गरम पाणी शरीराचे कसे नुकसान करते?

आयुर्वेदानुसार, मध हा अशा पदार्थांपैकी एक आहे, ज्याचे सेवन कोणत्याही गरम पदार्थासोबत करू नये. मधामध्ये गोड, तुरट गुण असतात, जे शरीरातील कफ संतुलित ठेवतात. कोमट मध हे विष आहे, ज्यामुळे शरीरात एएमए किंवा विषारी घटक तयार होतात. याचे गुणधर्म शरीरात गेल्यावर विषामध्ये बदलते. एएमए याचा अर्थ पचन न झालेले अन्न किंवा पचनमार्गात अडकलेले विष. ज्यामुळे अनेक रोग होतात.

मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

मध खाण्याची योग्य पद्धत

मध कच्चे किंवा अनपाश्चराइज्ड स्वरूपात सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

पाणी उकळून थंड करून त्यात मध मिसळून प्या. तरच वजन कमी होण्यास मदत होईल.

तूप किंवा तिळाच्या तेलासोबत मधाचे सेवन करू नये.

उष्ण - गरमीच्या हवामानात याचे सेवन अजिबात करू नये.

मधाचे इतर फायदे

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

उच्च-गुणवत्तेच्या मधामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बायोएक्टिव्ह प्लांट कंपाउंड आणि अँटिऑक्सिडंट्स, जसे की फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड आढळतात. गडद रंगाच्या मधामध्ये जास्त अँटिऑक्सिडेंट असतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील रिऍक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती तटस्थ करण्यात मदत करतात.

अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

रक्तातील साखरेची पातळी सुधारते

साखरेच्या तुलनेत मध खाण्याचा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळाला असेल. मधामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मध रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाइप 2 मधुमेहापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

मधामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत. जे नैसर्गिकरित्या आजार बरे करण्यास मदत करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाशी लढणारे गुणधर्म व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे होणा-या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

Web Title: Why drinking warm water with honey can be harmful for you as per Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.