Join us   

सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 6:14 PM

Why is MAIDA / white flour bad for health? आहारात मैद्याचे पदार्थ कमी खा, जंक फूडला नाही म्हणा तरच आजार राहतील दूर

सध्या लोकांना जंक फूडचे वेड लागले आहे. जंक फूड म्हटलं की, तेलकट, मैदायुक्त पदार्थ डोळ्यांसमोर येतात. मैदा खावा, पण अतिप्रमाणात मैदा खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अर्बन साईड लोकं सकाळी ब्रेड खातात, ज्यात मैदा असतो. याव्यतिरिक्त पराठा, पुरी, कुलचा, नान, पिझ्झा, बर्गर, मोमोज, बिस्किट या पदार्थांमध्ये सुद्धा मैद्याचा वापर होतो. हे पदार्थ चवीला तरी भन्नाट लागतात, पण आरोग्याचं काय?

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंह सांगतात, ''मैदा हे गव्हाच्या पिठापासून तयार होते. परंतु, मैदा करण्याची प्रक्रिया खूप वेगळी आहे. गव्हाच्या पिठातून त्यातील फायबर काढले जाते. त्या पिठामधून जर फायबर वेगळे होत असेल तर, हे पीठ आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते? त्यामुळे मैदा कमी खा पण जास्त खाणे टाळा''(Why is MAIDA / white flour bad for health?).

बद्धकोष्ठतेचा त्रास

डॉ. रंजना सिंह सांगतात, 'मैदामधून फायबर वगळल्यानंतर पीठ खूप पांढरेशुभ्र आणि गुळगुळीत होते. ज्यामुळे त्यापासून तयार पदार्थ आतड्यांमध्ये चिकटू लागतात. ज्यामुळे अपचन यासह बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.'

रोज मूग डाळ खाण्याचे ५ फायदे, मुगाचं वरण म्हणजे भरपूर पोषण

कोलेस्टेरॉल

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, 'पांढऱ्या पिठात भरपूर स्टार्च असते, ज्याच्या सेवनाने लठ्ठपणाची शक्यता वाढते. हळूहळू रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळीही वाढू लागते. अशा स्थितीत जर आपल्याला वजन कमी करायचं असेल व कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर, मैदा खाणं बंद करा.'

ब्लड शुगर वाढते

अतिप्रमाणात मैदा खाल्ल्याने ब्लड शुगर झपाट्याने वाढते. त्यामुळे रक्तात ग्लुकोज जमा होऊ लागते. ज्यामुळे मधुमेह, सांधेदुखी आणि हृदयाच्या निगडीत समस्या वाढतात.

सतत स्मार्ट फोन स्क्रोल करकरुन अंधूक दिसू लागले? ४ व्हिटॅमिन्सचा डोस वाढवा, नजर राहील शाबूत

हाडे कमकुवत होतात

गव्हाच्या पिठापासून मैदा तयार करण्यात येतो. मैदा बनवत असताना त्यातून प्रथिने नष्ट होतात. त्यामुळे ते अम्लीय बनते, जे हाडांमधून कॅल्शियम खेचते. ज्यामुळे हाडं कमकुवत होतात.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते

सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते. त्यामुळे मैदा टाळलेलाच बरा. 

टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स