घरात चपला किंवा स्लिपर्स घालणं ही काही नुसती फॅशन नाही. तर ती गरज बनली आहे. अजूनही घरामध्ये स्लिपर्स किंवा चपला घालणं जुन्या लोकांना पटत नाही. पण हाडांशी संबंधित काही त्रास टाळायचे असतील तर मात्र महिलांनी घरात स्लिपर्स घातल्याच पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात. बऱ्याच जणींना अशीही सवय असते की एरवी घरभर फिरताना स्लिपर्स वापरतात (Why it is important for women to wear slippers in kitchen?). पण स्वयंपाकघरात मात्र देव्हारा असल्याने चपला घालणं टाळतात. तिथेच नेमकी चूक होते, असं तज्ज्ञ सांगतात. (orthopedic doctor's opinion on wearing sleepers in house)
महिलांनी घरात आणि खासकरून स्वयंपाक घरात चप्पल का घालावी, याविषयी डॉक्टरांचा एक व्हिडिओ adityatalks and dr_bones1106 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
द्राक्षं, स्ट्राॅबेरी खाल्ल्यानंतर घसा खवखवतो? बघा डॉक्टरांनी सांगितलेलं त्यामागचं कारण आणि उपाय
बहुतांश महिलांचा सकाळचा आणि संध्याकाळचा असा कमीतकमी प्रत्येकी दोन- दोन तासांचा वेळ स्वयंपाक घरात जातोच. स्वयंपाक घरातली बहुतांश कामे त्या उभ्यानेच करत असतात. यामुळे टाचेवर खूप दाब येतो. याचा परिणाम म्हणजे साधारण चाळिशीनंतर बहुतांश महिलांना टाचेचं दुखणं मागे लागतं.
त्यामुळेच जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी ज्या चपलेचा सोल थोडा जाडसर असेल अशी चप्पल वापरावी.
ढाबास्टाईल शेवगा मसाला करण्याची झणझणीत रेसिपी- चव इतकी भारी की सगळेच मारतील ताव
जर स्वयंपाक घरात स्लिपर्स घालणं तुम्हाला अजिबातच पटत नसेल तर ओट्याच्या खाली फरशीवर एखादे जाडसर पायपुसणे अंथरुण ठेवा आणि त्या पायपुसण्यांवर उभे राहूनच काम करा. जर पायपुसणं पातळ असेल एकावर एक दोन- तीन पायपुसणे टाका आणि त्यावर उभं राहून काम करा. यामुळेही टाचदुखीचा त्रास टाळला जाऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.