अनेक जणांच्या नखांवर पांढरे ठिपके (white spots on nails) दिसतात. कुणी त्याला डेड सेल्स म्हणतं तर कुणी बगळ्याच्या कवड्या म्हणून त्याला ओळखतात. लहान मुलांसकट अनेक वयस्कर माणसांच्या नखांवरही असे पांढरे ठिपके दिसतात. पण बहुतांश लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. या पांढऱ्या ठिपक्यांचा आणि आरोग्याचा काही संबंध असू शकतो, असा विचार अनेकांच्या डोक्यातही येत नाही. पण या समस्येकडे एवढे दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्या शरीरात एका अतिमहत्त्वाच्या खनिजाची कमतरता (Zinc deficiency) आहे, हे सांगणारं ते एक लक्षण आहे. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी नुकताच याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.(Symptoms of Zinc deficiency)
पुजा माखिजा म्हणतात अनेक जणांना वाटतं की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखांवर असे पांढरे ठिपके दिसतात. तुम्हीही हाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकताय. कारण हे ठिपके कॅल्शियमच्या नाही तर झिंकच्या कमतरतेमुळे दिसून येतात. झिंकला ‘miracle mineral’ म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या शरीराला झिंकची गरज असते. पण शरीरात झिंक साठवून ठेवलं जात नाही. शिवाय प्रोटीनयुक्त पदार्थांमधून जास्तीतजास्त प्रमाणात झिंक मिळतं आणि प्रोटीन्सच्या माध्यमातून ते रक्तात मिसळण्यास मदतही होते. पण बहुतांश भारतीय लोकांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असतेच. त्यामुळे त्यांच्या शरीरात झिंकचीही कमतरता दिसून येते. आरोग्याच्या पुढील काही तक्रारींवरूनही शरीरात झिंकची कमतरता आहे, हे तुम्ही ओळखू शकता.
झिंकची कमतरता असेल तर...
१. रात्री शांत झोप न लागणे.
२. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.
३. सेक्सची इच्छा न होणे. किंवा त्याबाबतीत निरुत्साही असणे.
योग्य फिटिंगप्रमाणे शिवूनही ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग मिळत नाही? करा १ सोपा उपाय
४. वजन लवकर वाढणे.
५. हिरड्यांमधून रक्त येणे. दात किडणे.
६. कमी वयातच हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागणे.
७. लवकर थकवा येणे.
८. जखमा भरून येण्यास उशीर लागणे.
९. स्नायूंमध्ये थकवा जाणवणे.