Join us

आपल्याकडे एवढं ऊन असूनही शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का असते? तज्ज्ञ सांगतात ३ कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 16:27 IST

Main Reasons For The Deficiency Of Vitamin D: व्हिटॅमिन डी चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सुर्यप्रकाश. मग आपल्याकडे तो एवढ्या जास्त प्रमाणात असूनही बहुतेकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता का असते बरं?

ठळक मुद्दे बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी कमतरता का दिसून येते, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्यातही महिलांचे प्रमाण जरा जास्तच आहे.

काही मोजक्या भागांचे अपवाद सोडले तर भारतात बहुतांश ठिकाणी बारा महिने भरपूर सुर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर उन्हाचा कडाका विचारायलाच नको, पण एरवीही अगदी नको- नको होऊन जातं एवढं ऊन आपल्याकडे असतं. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन हा एक सर्वोत्तम स्त्रोत आहे, असं म्हणतात. मग असं असताना बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी कमतरता का दिसून येते, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्यातही महिलांचे प्रमाण जरा जास्तच आहे. बघा त्यामागची तज्ज्ञांनी सांगितलेली काही प्रमुख कारणं..(Main Reasons For The Deficiency Of Vitamin D)

 

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता का असते?

भरपूर ऊन असूनही जीवनशैलीमध्ये झालेला बदल हा बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचं एक प्रमुख कारण आहे, असं डॉ. मिनेश मेहता यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा 

ते म्हणतात की हल्ली शहरी लोक जास्त उन्हात जातच नाहीत. घरातून गाडीमध्ये, गाडीमधून ऑफिसमध्ये असा त्यांचा प्रवास असतो. लहान मुलांचंही तसंच आहे. मैदानावर जाऊन सुर्यप्रकाशात खेळण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. यामुळे ऊन असूनही आपल्याला त्यातून व्हिटॅमिन डी मिळवता येत नाही. 

 

डॉक्टर असंही सांगतात की शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी पाठीवर सुर्यप्रकाश पडणे गरजेचे आहे.

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

पण आपण ज्या पद्धतीचे कपडे घालतो, त्यानुसार पाठीवर सुर्यप्रकाश थेट पडत नाही. त्यासाठी पाठ उघडी राहील अशा पद्धतीने सकाळी थोडा वेळ काढून कोवळ्या सुर्यप्रकाशात बसायला हवं. 

 

डॉक्टरांनी सांगितलेलं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हल्ली सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर पडण्याची वेळ आली तरी लोक भरपूर प्रमाणात सनस्क्रिन लावून जातात.

World Saree Day: स्त्रियांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ५ सुंदर साड्या, पाहा यापैकी तुमच्याकडे किती आहेत

महिला चेहऱ्याभोवती स्कार्फ लपेटून घेतात. अंगात सनकोट, ग्लोव्ह्ज घालतात. यामुळे त्यांच्या शरीराचा खूपच थोडा भाग थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारात थोडा बदल केला तर नक्कीच शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढता येते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स