'ड्रायफ्रुट्स' हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दररोज मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून आपण दूर राहतो. सकस, पौष्टिक आहारासोबत जर 'ड्रायफ्रुट्सचा" डेली डाएटमध्ये समावेश केला तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरु शकते. बदाम, काजू, अक्रोड, खजूर, मनुका असे अनेक प्रकारचे 'ड्रायफ्रुट्स' आहेत. अनेक प्रकारचे नट्स आणि सीड्स खाणे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे महिलांच्या शरीरात हार्मोनल संतुलन राखतात आणि अनेक आरोग्य विकारांपासून त्यांचे संरक्षण करतात(Why are walnuts good for women?).
महिलांसाठीही 'अक्रोड' खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त आणि इतर अनेक पोषक घटक असतात. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणतात याचबरोबर ते मेंदूची शक्ती (Walnuts – 7 Reasons Why You Need Them in Your Diet) वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरते. एवढंच नव्हे तर स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. हृदयासंबंधित आजारांसाठी अक्रोड खाण परिणामकारक ठरत. अक्रोडचा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्कशेक यांसारख्या पदार्थांमध्ये केला जातो. दिल्ली विद्यापीठातून न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केलेल्या आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी महिलांना अक्रोड खाल्ल्यामुळे मिळणारे फायदे कोणते याबद्दल सांगितले आहे(Why must walnuts be included in a diet?).
महिलांनी रोजच्या डाएटमध्ये अक्रोडचा समावेश का करावा ?
१. अक्रोडमध्ये ओमेगा - ३ फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. अक्रोड मधील ओमेगा - ३ फॅटी अॅसिड पीसीओडी सारख्या प्रॉब्लेम्समध्ये फिट राहण्यासाठी मदत करतात.
२. अक्रोड खाल्ल्याने महिलांच्या शरीरात ओमेगा - ३ आणि ओमेगा - ६ चे प्रमाण कायम राहते. त्यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी योग्य राहते आणि शरीरात हार्मोनल संतुलन योग्य प्रमाणांत राखले जाते.
तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...
व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...
३. थायरॉईड ही आजकालच्या महिलांमध्ये एक कॉमन समस्या आहे. अक्रोड खाल्ल्याने थायरॉईड संप्रेरकाची पातळी सुधारते आणि संतुलित राखते.
४. 'अक्रोड' खाल्ल्याने शरीरातील एंड्रोजनची पातळी कमी होण्यास मदत होते आणि महिलांच्या अंडाशयांचे कार्य सुधारते. याचबरोबर अक्रोडमध्ये बी कॉम्प्लेक्स असते. जे गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जाते.
वेटलॉससाठी गव्हाच्या पिठाऐवजी खा ४ प्रकारच्या पौष्टिक पिठाच्या पोळ्या, वजनात फरक दिसेल झटपट...
५. जर स्त्रियांना कोणत्याही हार्मोनल स्थितीमुळे झोपणे कठिण होत असेल तर अक्रोड त्या समस्येपासूनही आराम देते. हे मेलाटोनिन हार्मोनची पातळी सुधारून झोप येण्यास मदत करते. अक्रोड फक्त ठराविक प्रमाणातच खावे. जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
तापसी पन्नू सांगते ‘सनसेट ड्रिंक’ची खास रेसिपी, वाढलेलं वजन कमी करण्याचा तिचा स्पेशल उपाय...
६. अक्रोड हा असा सुकामेवा आहे, ज्यात ओमेगा - ३ हे फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी संतुलित राहते आणि पचन क्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारली की आपोआपच त्वचेचे आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यशिवाय अक्रोडमध्ये खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे महिलांनी अक्रोड रोज खाणे गरजेचे आहे.
७. डाएटमध्ये दररोज ५ अक्रोड आणि १५ ते २० मनुक्यांचा समावेश केल्याने आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर ठरते.