दुध (Milk) तब्येतीसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. दुधासोबत मखाने खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात कारण दूध आणि मखाने दोन्ही तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. मखाने कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, आयर्न, फॅट, फॉस्फरस यांसारख्या तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. (Makhana Benefits) दुधात व्हिटामीन ए, व्हिटामी डी, प्रोटीन, कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात. याच कारणामुळे हे याला पोषक तत्वांचे भंडार मानले जाते. (Makhana Eating Tips)
दुधात मखाणे भिजवून खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वांबरोबरच अनेक फायदे मिळतात. दूधात मखाने खाल्ल्याने कमकुवतपणा दूर होतो. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. दुधात मखाने मिसळून खाण्याबाबत आयुर्वेदाचार्य डॉय विभा वर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. (Eat Makhana Mixed With Milk Helps In Removing Weakness And Controlling Blood Sugar)
दुधात मखाने भिजवून खाण्याचे ५ फायदे ( Benefits Of Consuming Makhana With Milk)
शारीरिक कमकुवतपणा दूर करण्यासाठी दूध आणि मखाण्यांचे कॉम्बिनेशन परिणामकारक मानले जाते. अशा स्थिती तुम्हाला थकवा, कमकुवतपणा जाणवत नाही. गरम दूधता मखाणे मिसळून खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. दुध आणि मखाने प्रोटीन, आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने कमकुवतपणा जाणवत नाही आणि एनर्जी टिकून राहते.
दूध आणि मखान्यांचे कॉम्बिनेशन हाडांना चांगले ठेवते. जर तुमची हाडं कमकुवत असतील तर दुधात मखाने भिजवून ते खा. कारण दूध आणि मखाने हे दोन्ही पदार्थ कॅल्शियमने परिपूर्ण असतात. ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते. नियमित दूधासोबत मखाण्यांचे सेवन केल्यानं सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त आर्थरायटिसची समस्याही टाळता येते.
दुधात मखाने मिसळून खाणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. मखान्यांमध्ये हायपोग्लायसेमिक आणि एंटी ऑक्सिडेंट्स यांसारखे गुण असतात. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यानं डायबिटीससारख्या आजारांचा धोका टळतो. या कॉम्बिनेशनच सेवन करण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्या.
सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला
हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही दूध आणि मखान्यांचे सेवन करू शकता. यासाठी कोमट दुधात मखाने घालून खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाने मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लेवेनॉईड्सस यांसारखी पोषक तत्व असतात. (Ref) ज्यामुळे हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत होते. या कॉम्बिनेशचे नियमित सेवन केल्यानं हृदयासंबंधित आजारांची जोखिम कमी होण्यास मदत होते.
केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस
दुधात मखाने मिसळून खाल्ल्यानं झोपेची गुणवत्ता सुधारते. दुधामुळे तुम्हाला अनिद्रेच्या त्रासापासून बचाव होतो. दुधात अशी अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे चांगली झोप येते. हे कॉम्बिनेशन रात्री झोपण्याआधी घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. मखाने कोमट दुधात मिसळून खायला हवेत.