Join us

तुळशीची पानं चावून का खाऊ नयेत? कारण समजल्यावर पुन्हा करणार नाही अशी चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:42 IST

तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.

तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे  आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही. 

तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत?

मर्क्युरिक एसिड

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात.या व्यतिरिक्त, त्यात र्क्यूरिक एसिड देखील असतं. हे एसिड दातांना नुकसान पोहोचवू शकतं. दातांचं संरक्षण करण्यासाठी इनॅमलचा एक थर असतो. या मर्क्युरिक एसिडमुळे तो थर कमकुवत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुळशीची पाने चावून न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

आर्सेनिक

तुळशीच्या पानांमध्ये आर्सेनिक नावाचा घटक देखील असतो. त्याचे प्रमाण कमी आहे परंतु आर्सेनिक आपल्या लिव्हर आणि किडनीवर परिणाम करू शकतं. म्हणून, तुळशीची पानं मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

एसिडिक घटक

तुळशीमध्ये काही एसिडिक घटक देखील असतात. अशा परिस्थितीत, तुळस चावून खाल्ल्याने तोंडात तसेच पोटात एसिड निर्माण होऊ शकते. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी तुळशीची पाने योग्य पद्धतीने खा.

तुळशीची पानं खाण्याची योग्य पद्धत कोणती? 

- तुळशीची पानं तोडून ती नीट धुवून घ्या.

- पानं थेट खाण्याऐवजी, चहा किंवा काढा बनवणं हा एक चांगला पर्याय आहे.

सततच्या डोकेदुखीवर 'तुळस' रामबाण उपाय; 'या' ४ प्रकारे करा वापर, दुखणं होईल छूमंतर

डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. तुळस ही डोकेदुखी तसेच इतर अनेक समस्यांसाठी गुणकारी असून रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये  अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेन रिलीविंग प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटतं.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य