Join us   

पावसाळ्यात दूध पिऊ नये- दही खाऊ नये असं म्हणतात ते खरं की खोटं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 3:12 PM

Why should we Avoid Curd and Milk in Monsoon? पावसाळ्यात दही-दूधाने खरंच पोटाला काही अपाय होतो का?

संपूर्ण भारतात पावसाने हजरी लावली आहे. रिमझिम सरीसोबत गारवा हवाहवासा वाटतो. परंतु, गारव्यासह पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. म्हणूनच या काळात आरोग्याची तशीच खाण्या - पिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. त्यात दूध आणि दह्याचा देखील समावेश आहे.

परंतु, पावसाळ्यात दूध आणि दही का खाऊ नये? मॉन्सूनमध्ये दूध - दही खाल्ल्याने काय होते? यासंदर्भात, ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी, पावसाळ्यात दूध आणि दह्याचे सेवन कमी प्रमाणात का करायला हवा याची माहिती दिली आहे(Why should we Avoid Curd and Milk in Monsoon?).

जंतू पसरतात

पावसाळ्यात हिरवळ वाढते, यासह किटाणू देखील वाढते. हे किडे गाय, म्हैस, शेळी यांच्या चारांमध्ये जाऊन बसतात. हे जंतू जनावरांच्या पोटात जातात. जनावरे जेव्हा दूध देतात, तेव्हा त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला इजा होऊ शकते. त्यामुळे दूध उकळून किंवा कमी प्रमाणात प्यावे.

अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला

पचनाची समस्या

पावसाळ्यात पचनक्रिया थोडी मंदावते, त्यातच या ऋतूत आपण दूध - दही खाल्ले तर मेटाबॉलिज्म बिघडू शकते. त्यामुळे ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे, पोटात संसर्ग होण्याचा धोकाही बराच वाढतो. अशा स्थितीत दूध - दही कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला मिळतो.

मुठभर शेंगदाणे गुळाच्या खड्यासह खाण्याचे ५ फायदे, आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा

सर्दी

उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे आहारात आपण दह्याचा समावेश करतो. परंतु, पावसाळ्यात वातावरण थंड असते. त्यामुळे दही खाल्ल्यास सर्दी - खोकल्याचा त्रास वाढू शकतो. किंवा तापही येऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

टॅग्स : मोसमी पाऊसआरोग्यहेल्थ टिप्सपावसाळा आणि पावसाळी आजारपण