Join us   

रोज चहा पिण्याची सवय घातक? त्यात घाला चिमुटभर 'ही' पांढरी गोष्ट; आरोग्य सुधारेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 12:16 PM

Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea : चहामध्ये मीठ..? ऐकून आश्चर्य वाटलं ना?

काही लोकांसाठी चहा म्हणजे स्वर्गसुख. अनेक लोकांच्या दिनचर्येचा तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा चहा आरोग्यदायी नसल्याचे लोक सांगतात. दूध - साखरेचा चहा न पिण्याचाही सल्ला दिला जातो. चहाचे असंख्य प्रकार आहेत, जे लोक त्यांच्या इच्छेनुसार निवडतात. पण आपण कधी मीठ घालून चहा प्यायला आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते चहामध्ये चिमूटभर काळे मीठ घातल्याने ते आरोग्यदायी पेय बनते. हा चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात(Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea).

मीठ घालून चहा पिण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढते

यासंदर्भात, डॉ मोहम्मद आसिफ नागौरी सांगतात, मिठाचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. शिवाय ऋतू बदलांनुसार होणारा त्रास आपल्याला छळू शकणार नाही.

वजन कमी करण्यास मदत

चहामध्ये काळे मीठ घातल्याने त्याची चव वाढते. तसच मिठाचा चहा प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

वेट लॉससाठी चपाती खाणे योग्य की भाकरी? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी - त्वचेवर ग्लो हवा तर

घसादुखीपासून आराम

मीठ घालून चहा प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळू शकते. शिवाय ऋतू बदलांनुसार होणारे आजार दूर होऊ शकतात.

डोकेदुखीपासून आराम

डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर मिठाचा चहा प्या. या चहाचे सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

फक्त १५ मिनिटांत प्रेशर कूकरमध्ये लावा दही! पाहा दही लावण्याची युनिक ट्रिक, मिळेल परफेक्ट दही

मिठाचा चहा बनवण्याची पद्धत

मिठाचा चहा करण्यासाठी चहापत्ती, मीठ आणि साखर लागेल. आपण साखरेशिवायही चहा बनवू शकता. मिठाचा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चहापत्ती, मीठ आणि पाणी घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. आपण दूध न घालताही चहा बनवू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य