Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंबा पाण्यात न भिजवता खाताय? आरोग्य बिघडेल! आंबा खाण्यापूर्वी किती वेळासाठी भिजत ठेवावा?

आंबा पाण्यात न भिजवता खाताय? आरोग्य बिघडेल! आंबा खाण्यापूर्वी किती वेळासाठी भिजत ठेवावा?

Why should you soak mangoes in water before eating : आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवतात? यामुळे शरीराला नक्की कोणते फायदे मिळतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 04:41 PM2024-04-23T16:41:44+5:302024-04-23T16:42:44+5:30

Why should you soak mangoes in water before eating : आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवतात? यामुळे शरीराला नक्की कोणते फायदे मिळतात?

Why should you soak mangoes in water before eating? | आंबा पाण्यात न भिजवता खाताय? आरोग्य बिघडेल! आंबा खाण्यापूर्वी किती वेळासाठी भिजत ठेवावा?

आंबा पाण्यात न भिजवता खाताय? आरोग्य बिघडेल! आंबा खाण्यापूर्वी किती वेळासाठी भिजत ठेवावा?

उन्हाळा सुरु झाला की, वेध लागतात आंब्याचे (Mango Season). आंबा हा जवळपास सगळ्यांचाच आवडता फळ आहे. फार क्वचित लोकं असतील ज्यांना फळांचा राजा आंबा आवडत नसेल. आंब्याचे अनेक प्रकार आहेत (Health Benefits). आपल्या आवडीनुसार लोक आंबे खातात. पण आपण पाहिलं असेल की, आई किंवा आजी आंबा खाण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात भिजत घालत असे. आंबे खाण्यापूर्वी भिजत का ठेवावी? असे न केल्याने आंब्यातील पौष्टीक घटक शरीराला मिळणार नाही का?

यासंदर्भात, आयुर्वेद एक्सपर्ट दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवणे का आवश्यक आहे? आंबा पाण्यात किती वेळासाठी भिजत ठेवावे? याची माहिती दिली आहे(Why should you soak mangoes in water before eating).

आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवावा?

आयुर्वेदतज्ज्ञ पिकलेले आंबे खाण्यापूर्वी १ ते २ तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवण्याचा सल्ला देतात. जर आपल्याकडे वेळेचं अभाव असेल तर, आपण आंबा २० ते ३० मिनिटांसाठी देखील पाण्यात भिजत ठेऊ शकता.

चहाशिवाय चैन पडत नाही आणि चहाने ॲसिडिटी होते? चहा पिण्याआधी प्या १ गोष्ट'; त्रास बंद

आंबा पाण्यात भिजवणे महत्वाचे का आहे?

तज्ज्ञांच्या मते, आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जातात. जे एक प्रकारचे अँटी न्यूट्रिएंट आहेत. हे शरीराला काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता भासू शकते. शिवाय शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते. त्यामुळे आंबा नेहमी पाण्यात भिजवल्यानंतर खावे.

आंबा भिजवून खाण्याचे इतर फायदे

भिजवलेला आंबा खाल्ल्याने मुरुम, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधी इतर समस्या टाळण्यास मदत होते.

आंबा भिजत घातल्याचे इतर फायदे

आंबा पाण्यात भिजवल्याने सर्व कीटकनाशके, रसायने निघून जातात. यासोबतच आंब्यावर साचलेली घाण, धूळ आणि मातीही पूर्णपणे निघून जाते.

ठिपक्यांची पुरी कधी खाऊन पाहिली आहे का? बघा भन्नाट ट्रिक- नेटकरी म्हणाले 'पुरीला कोरोना झाला आहे का'?

आंब्यातील पोषक घटक

फळांचा राजा आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात बरेच पोषक घटक आढळतात. मुख्य म्हणजे त्यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेह किंवा फिटनेस फ्रिक लोकही आंब्याचे सेवन करू शकतात. 

Web Title: Why should you soak mangoes in water before eating?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.