Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पालथं झोपायची सवय चांगली की वाईट ? डॉक्टर सांगतात, तुम्ही नेहमी पालथं झाेपत असाल तर...

पालथं झोपायची सवय चांगली की वाईट ? डॉक्टर सांगतात, तुम्ही नेहमी पालथं झाेपत असाल तर...

What happens when you sleep on your stomach : पालथं झोपण्याची सवय अनेकांना असते पण तसं झोपणं तब्येतीसाठी चांगलं की वाईटच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 08:19 PM2023-09-14T20:19:42+5:302023-09-14T20:39:43+5:30

What happens when you sleep on your stomach : पालथं झोपण्याची सवय अनेकांना असते पण तसं झोपणं तब्येतीसाठी चांगलं की वाईटच ?

Why sleeping on your stomach can be harmful for health. | पालथं झोपायची सवय चांगली की वाईट ? डॉक्टर सांगतात, तुम्ही नेहमी पालथं झाेपत असाल तर...

पालथं झोपायची सवय चांगली की वाईट ? डॉक्टर सांगतात, तुम्ही नेहमी पालथं झाेपत असाल तर...

खाण्या - पिण्यासोबतच झोपेचाही थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चांगल्या आरोग्यासाठी ६ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. असे असले तरीही सध्याच्या धावपळीच्या व बिझी लाइफस्टाइलमुळे काहीजणांना नीट झोपायलाही वेळ मिळत नाही. आपली रात्रीची झोप ही अतिशय महत्वाची असते. जर रात्रीची झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसरा संपूर्ण दिवस हा आळसात जातो. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे सगळ्यांची झोपायची पद्धत ही वेगळी असते. काही लोक असे असतात की ज्या स्थितीत त्यांना झोप येते त्याच स्थितीत ते झोपतात. याचबरोबर काहीजणांना पोटावर किंवा डाव्या - उजव्या कुशीवर झोपण्याची सवय असते(Sleeping On Your Stomach – Is it Bad for You?).

प्रत्येक व्यक्तीला आपली झोपण्याची पद्धत व सवयी या फार प्रिय असतात. काहीजण एका कुशीवर तर काहीजणांना पोटावर झोपण्याची सवय असते. पोटावर झोपल्याने (What happens when you sleep on your stomach) चांगली आणि गाढ झोप येते, असे त्यांना वाटते. पण अशा पद्धतीनं झोपण्याच्या सवयीमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आजारांची लागण होऊ शकते. सोबत शारीरिक दुखण्याचीही समस्या निर्माण होते. असे असले तरीही घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा या स्थितीत झोपण्यास मनाई करतात. तज्ज्ञ देखील झोपण्याची ही स्थिती योग्य मानत नाहीत. आता प्रश्न असा आहे की पोटावर झोपल्याने (Is It Bad to Sleep on Your Stomach?) खरंच काही त्रास होतो का? याचे उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. याबाबत पी.एस.आर.आय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ.भूषण भोळे यांनी अधिक माहिती दिली आहे(Why sleeping on your stomach can be harmful for health). 

पोटावर पालथे झोपण्याची स्थिती योग्य आहे का ? 

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पोटावर पालथे झोपण्याची स्थिती ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट मानली जाते. पोटावर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होते तसेच स्लीप एपनियाच्या समस्येतही याचा फायदा होतो. असे असले तरीही हे एकूण आरोग्यासाठी चांगले नाही.

अपचन, आंबट ढेकर, ॲसिडिटी होतेय ? घरगुती 'पाचक गोळीचा' उपाय, पोटाच्या समस्या होतील दूर...

 वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

पोटावर पालथे झोपण्यामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात ? 

१. पचनाच्या समस्या आणि अंतर्गत नुकसान :- जर आपण जास्त वेळ पोटावर पालथे झोपलात तर आपला अंतर्गत भाग बराच काळ दबावाखाली राहतो, ज्यामुळे आतडे, मूत्रपिंड आणि यकृतावर दबाव येऊ शकतो. याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ शकते ज्यामुळे आपल्याला शारीरिक अनेक समस्या येऊ शकतात. जेवल्यानंतर लगेच पोटावर झोपल्यास पोटावर दबाव येतो, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे आपल्याला पोट फुगण्याची, पोटदुखी आणि अपचनाची समस्या त्रास देऊ शकते. 

कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...

२. चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान :- पोटावर झोपल्याने, आपला चेहरा एका स्थितीत बराच काळ दाबाखाली राहतो, या दरम्यान ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ शकते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडण्याची तसेच कमी वयातच त्वचा डल, निस्तेज व म्हातारी दिसू लागण्याची समस्या उद्भवू शकते.

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

३. कंबरदुखी वाढते :- पोटावर झोपणाऱ्या लोकांना कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागतो. पोटावर झोपल्यानं आपल्या पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. यामुळे मणक्यांची रचना हलण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीनं झोपलात तर पाठीचा कणा तसंच कमरेवर अतिरिक्त ताण येतो. पाठीच्या मणक्याला इजा होण्याची शक्यता असते. यामुळे कंबर दुखीच्या समस्या निर्माण होतात. या वेदना कमरेच्या कोणत्याही भागात उद्भवू शकतात. पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा आधार असतो. त्यामुळे झोपताना काळजीपूर्वक झोपावे.

पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...

४. डोकेदुखी :- जेव्हा आपण पोटावर झोपतो आणि उशीवर डोके ठेवतो. त्यावेळेस आपली मान खालील बाजूस वळते. यामुळे मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. डोक्यामध्ये एक प्रकारे रिक्तपणा आणि तणाव निर्माण होतो. यामुळे डोकेदुखी आणि डोके जड होते. तर काही जणांना मळमळ होण्याचाही त्रास होतो.

५. वेदना आणि वारंवार हातापायांना मुंग्या येणे :- पोटावर झोपल्याने शरीरात निष्क्रियता जाणवते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि मुंग्या येण्याची समस्या जाणवते. काहीवेळा शरीर सुन्न होऊन जातंय असं वाटतं. जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो. त्यांना झुकण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

Web Title: Why sleeping on your stomach can be harmful for health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.