Join us   

D3, B12 तेव्हाच वाढेल जेव्हा 'हा' पदार्थ खाल, बघा सप्लिमेंट्स घेऊनही D3, B12 कमी का असतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 12:45 PM

Why Vitamin D3, B12 Level Is Not Increases: व्हिटॅमिन D3, B12 ची कमतरता अनेकांना जाणवते. सप्लिमेंट्स घेऊनही ते फारसं वाढत नाही, बघा त्यामागचं कारण...

ठळक मुद्दे मॅग्नेशियमची कमतरता तुमच्या शरीरात असेल तर बाहेरून कितीही D3, B12 तुमच्या शरीरात आलं तरी ते शरीर स्विकारणार नाही

D3, B12 हे असे व्हिटॅमिन्स आहेत ज्यांची बहुतांश शाकाहारी लोकांच्या आहारात कमतरता असते. आपल्याला माहितीच आहे की हाडांच्या मजबुतीसाठी D3 अतिशय गरजेचं आहे, तर शरीरातली मज्जा संस्थेचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी B12 गरजेचं आहे. हे २ घटक शरीरात पुरेशा प्रमाणात नसले तर शरीराला अनेक वेगवेगळे त्रास होतात. हे त्रास कमी करण्यासाठी मग डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक जण त्यांच्या सप्लिमेंट्स घेतात किंवा मग असे पदार्थ खातात, ज्या पदार्थांमधून हे दोन्ही घटक पुरेशा प्रमाणात मिळतील. पण या दोन्ही उपायांमुळे शरीरातल्या D3, B12 ची पातळी चांगल्याप्रकारे वाढत नाही. असं होण्याचं कारण नेमकं काय आहे ते पाहूया...(why vitamin D3, B12 level is down instead of having suppliments and vitamin D3, B12 rich food)

 

सप्लिमेंट्स घेऊनही व्हिटॅमिन D3, B12 चे प्रमाण का वाढत नाही?

सप्लिमेंट्स घेऊनही किंवा मग वेगवेगळे पदार्थ खाऊनही शरीरातील D3, B12 चे प्रमाण का वाढत नाही, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ versatilevivesgallery या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पावसाळ्यात ऊन ऊन खिचडी साजूक तूप खाणे खूपच फायद्याचे!! बघा पौष्टिक खिचडी करण्याच्या ४ टिप्स...

यामध्ये तज्ज्ञ सांगत आहेत की वेगवेगळ्या पदार्थांमधून किंवा सप्लिमेंट्समधून तुमच्या शरीरात D3, B12 तर येतं. पण ते शरीरात शोषून घेण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असणं अतिशय गरजेचं आहे. जर मॅग्नेशियमची कमतरता तुमच्या शरीरात असेल तर बाहेरून कितीही D3, B12 तुमच्या शरीरात आलं तरी ते शरीर स्विकारणार नाही किंवा व्यवस्थित शोषून घेऊ शकणार नाही. त्यामुळे मॅग्नेशियम देणारे पदार्थ तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे.

 

मॅग्नेशियम कोणत्या पदार्थांमधून मिळते?

हरबरे किंवा चणे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम देतात. याशिवाय पालक, बदाम, काजू, राजगिरा, अव्हाकॅडो, डार्क चॉकलेट, भोपळ्याच्या बिया या पदार्थांमधून चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार वयाप्रमाणे प्रत्येकाला दररोज किती मॅग्नेशियमची गरज असते ते पाहा..

डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी

१ ते ३ वर्षे- ८० एमजी

४ ते ८ वर्षे- १३० एमजी

९ ते १३ वर्षे- २४० एमजी

१४ ते १८ वर्षे- मुलगा- ४१० एमजी, मुलगी- ३६० एमजी

१९ ते ३० वर्षे- पुरुष ४०० एमजी, महिला ३१० एमजी

३० वर्षांवरील व्यक्ती- पुरुष ४२० एमजी, महिला ३२० एमजी

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न