कधी आपलं अंग ठणकत असतं तर कधी पाय खूप जास्त दुखत असतात. अशावेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन्स, खनिजे, लोह यांच्या टेस्ट करतो. एकदा ब्लड टेस्ट केल्या की आपल्या शरीरात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे लक्षात येते. एकदा कमतरता आहे हे लक्षात आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा काही वेळा मनानेच आपण सप्लिमेंटसच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतो. आपल्या शरीराला या सप्लिमेंटसची आवश्यकता असली तरी लगेचच ही सप्लिमेंटस घ्यावीत की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सप्लिमेंटस घेण्याचे शरीरावर विविध परीणाम होतात आणि आपल्याला हे परीणाम भोगावे लागू शकतात. मात्र गरजेनुसार सप्लीमेंटस घ्यावीच लागतात (Why We need to take supplements even when we are eating Healthy ).
१. आपल्याला सप्लीमेंटस घ्यावी लागतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण खात असलेल्या अन्नात पुरेसे पोषण नसते. आपण जे खातो, ज्या पद्धतीने खातो, जसे चावतो, आपल्या मनाची अवस्था अशा सगळ्यावर या गोष्टी अवलंबून असतात. या सर्व गोष्टींवर आपली पचनक्रिया अवलंबून असते.
२. हल्ली आपण खाताना अनेकदा खूप घाईत असतो. आपल्याला सतत काहीतरी हवे असते आणि आपण त्याच्या मागे पळत असतो. त्यामुळे आपण खातो खरे पण त्यातून आपल्याला म्हणावे तसे पोषण मिळत नाही.
३. आपले पालक किंवा आपले आजी-आजोबा जे अन्न खात होते त्यापेक्षा आपण खात असलेल्या अन्नपदार्थात नक्कीच ३० ते ५० टक्के कमी पोषण असते. तेव्हा शेतीसाठी वापरात येणारी माती सकस होती. आता ती खूप जास्त प्रमाणात वापरली गेल्याने आणि खते आणि रसायनांच्या वापराने तिचा कस निघून गेलेला दिसतो.
४. अशावेळी खाल्लेल्या अन्नातून शरीराचे पोषण होत नसेल तर सप्लीमेंटस घ्यायला हरकत नाही. त्यामुळे शरीराला न मिळणारे पोषक घटक मिळतात. म्हणून सगळ्याच प्रकारची सप्लीमेंटस चांगली असतात असं नाही. तर जी चांगली आणि गरजेची सप्लीमेंटस असतात तीच घ्यायला हवीत.