Join us   

काम करत असताना सुस्ती - झोप येते? खा ४ हेल्दी - टेस्टी पदार्थ, वाढेल वर्क प्रॉडक्टिव्हिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 5:22 PM

Why you feel sleepy at work and how to fix it वर्क प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खा ४ पदार्थ, सुस्ती येईल कमी - एनर्जी वाढेल..

सध्या अनेकांची जीवनशैली खूप व्यस्त झाली आहे. ऑफिस, घर या सगळ्यात माणूस गुंतून गेला आहे. अनेकांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. कामाच्या तणावामुळे अनेक लोकं एंजायटीला बळी पडत आहे. या सगळ्या कारणामुळे लोकांचे शरीरही सुस्त झाले आहे. वेळेवर काम आटोपण्यासाठी एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे. अनेकदा समोर काम भरपूर असते, पण कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. जर आपली सुस्तपणामुळे वर्क प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली असेल तर, आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा.

अनेकदा काम करताना थकवा, झोप, किंवा सुस्तपणा येतो. अशा स्थितीत आपण जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खातो. या पदार्थांमुळे वजन तर वाढतेच, यासह आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळून ४ प्रकारच्या हेल्दी पदार्थ खाऊ शकता(Why you feel sleepy at work and how to fix it).

बदाम

ऑफिसमध्ये काम करत असताना जेव्हा आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, सुस्तपणा जाणवतो, तेव्हा उलट सुलट खाण्यापेक्षा बदाम खा. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळे आपल्या काम करण्याची उर्जा मिळते. त्यातील प्रोटीन्समुळे थकवा कमी होतो.

दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?

केळं

शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रोज एक केळं खावं. यामुळे शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते. शरीरात आवश्यक प्रमाणात ग्लुकोज राहते आणि केळी फोकस आणि एनर्जी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या कार्बोहाइड्रेटमुळे पोट बराच काळ भरलेले राहते.

मखाना

मखाना खाण्याचे अनेक फायदे आहेत. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कामाच्या वेळी जर छोटी भूक लागत असेल तर, कुरकुरीत मखाना खा.

भराभरा जेवल्यानेच वजन वाढतं, पोट सुटतं! १ घास ३२ वेळा चावून खा, तरच....

सोया नट्स

कुरकुरीत आणि स्वादिष्ट सोयानट्स सोयाबीनपासून तयार केले जाते. सोयानट्स फायबर आणि प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे.  सोय नट्स खाल्ल्याने हृदय आणि हाडांच्या आरोग्य उत्तम राहते. स्नॅक्सऐवजी आपण सोयानट्स खाऊ शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य