Join us   

जेवताना फक्त १ चमचा लोणचं खा, तब्येतीसाठी अतिशय गुणकारी तोंडीलावणं- पारंपरिक लोणच्यांचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 4:51 PM

Why You Must Add Achaar To Your Daily Diet : आतड्यांच्या आरोग्यासाठी लोणचं खाणं उत्तम ठरतं.  ज्यामुळे शरीराला रिबूट करणारे निरोगी बॅक्टेरिया तयार होतात. पण कोणतीही गोष्टी मर्यादीत प्रमाणातच खायला हवी.

भारतीय घरांमध्ये नेहमीच लोणचं मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. चपाती, पराठा, भात, भाजी किंवा ब्रेडबरोबर तुम्ही लोणचं  खाऊ शकतात. (Cooking Hacks) साधी भाजी असेल किंवा फक्त वरण भात केला असेल तरी लोणचं खाल्ल्याने तोंडाला चांगली चव येते.  लोणचं खाल्ल्याने फक्त तोंडाला चव येत नाही तर तब्येतील बरेच फायदे मिळतात.  लोणच्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. लोणचं खाण्याचे बरेच फायदे असतात. (Benefits of Eating Pickle)

२०१० च्या एका रिसर्चनुसार लोणचं खाल्ल्याने मसल्स क्रॅम्प कमी होण्यास मदत होते. रिपोर्टनुसार लोणचं खाल्ल्याने इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स राहण्यास मदत होते. (Ref) डायबिटीस टाईप २ चा धोका कमी होतो. इलेक्टोलाईट बॅलेंन्स राहण्यास मदत होते. यातून शरीराल एंटी ऑक्सिडेंट्स मिळतात. याशिवाय शुगर  कंट्रोलसाठी तुम्ही इतर व्हिनेगरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

जेवल्यानंतर पोट फुगतं-गॅस होतो? १ ग्लास पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; त्वरीत मिळेल आराम

द पिकल स्टोरीच्या ब्लॉगनुसार लोणचं हा मूळचा पारसी शब्द आहे. ज्याचा संदर्भ असा की चूर्ण किंवा खारवून केलेली मूळं, पानं, भाज्या, फळं आणि मीठ, व्हिनेगर. लोणचं या शब्दाचा मूळ शब्द पेकेल डच आहे. तुम्हाला प्रत्येक प्रदेशात आणि उप प्रदेशात लोणच्याचे विविध प्रकार मिळतील. ज्यामळे ते भारतीय खाद्यपदार्थांच्या नकाशात एक समृद्ध आणि महत्वपूर्ण आहे. 

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट

 पोषणतज्ज्ञ ऋजुता  दिवेकर यांच्या म्हणण्यानुसार लोणते हे व्हिटामीन डी,  व्हिटामीन ए आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे.  तुमच्या रोजच्या जेवणात लोणच्याचा समावेश करा. ज्यामुळे शरीराला प्री आणि प्रो बायोटिक्सचे योग्य कॉम्बिनेशन मिळेल आणि पोषण मिळण्यासही मदत होईल.

लोणचं रोज खावे का?

अनेकांना रोज लोणचं खायला आवडतं तर काहींना जराही आवडत नाही. लोणच्यामुळे शरीरातील सोडीयमची पातळी वाढू शकते. यकृतातील विषारी पदार्थ वाढू शकतात अशी शंका अनेकांना येते. मॅक्रोबायोटिक्स आणि न्युट्रिशनिस् हेल्थ प्रॅक्टीशनर शिल्पा अरोरा यांच्या म्हणण्यानुसार लोणचं हे वर्षभर काही फळं आणि भाज्या आंबवण्याचा, खाण्याचा पारंपारीक मार्ग आहे.  आतड्यांच्या आरोग्यासाठी लोणचं खाणं उत्तम ठरतं.  ज्यामुळे शरीराला रिबूट करणारे निरोगी बॅक्टेरिया तयार होतात. पण कोणतीही गोष्टी मर्यादीत प्रमाणातच खायला हवी.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य