मॉडर्न लाइफस्टाइलमुळे अनेक लोकं आपली संस्कृती आणि प्रथा विसरत चालले आहे. यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते थेट खाण्यापिण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. आजकाल लोकं खाली बसून जेवण करायला विसरले आहे. नाश्त्यापासून ते डिनरपर्यंत प्रत्येक गोष्ट खुर्ची - टेबलवर बसून खाल्ले जाते. यामुळे दिवसेंदिवस आपले शरीर आळशी आणि स्थूल बनत चालले आहे.
अनेक घरात आजही लोकं खाली बसून जेवण करतात. आजही वडीलधारी मंडळी छान मांडी घालून, जमिनीवरच जेवायला बसतात. याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आहे. जमिनीवर बसून अन्न ग्रहण करण्याचे अनेक फायदे आहेत. याची माहिती हेल्थ कोच डिंपल जांगडा यांनी दिली आहे(Why you must eat food while sitting in the Sukhasana).
एक चमचा मधात मिसळा मेथीचे दाणे, पोटाची चरबी झरझर घटेल-रक्तातील साखरही राहील नियंत्रणात
एक्स्पर्टच्या मते, 'खाली बसून जेवल्याने पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. फक्त मांडी घालून न बसता, सुखासन या मुद्रेत बसल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यासाठी खाली बसा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि पाय पुढे पसरुन बसा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून मांडी घालून बसा.'
सुखासन मुद्रेत अन्न ग्रहण करण्याचे फायदे
तज्ज्ञांच्या मते, सुखाचा अर्थ 'आरामदायी' आणि आसन म्हणजे 'बसणे'. सुखासनामुळे मन आणि शरीर दोन्हींना आराम मिळतो. जेव्हा मेंदू शांत होतो, तेव्हा तो खाण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. अन्न लक्ष देऊन खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वांचे योग्य पचन होण्यास मदत होते.'
तूप तब्येतीसाठी आवश्यक खरे, पण ताकद हवी म्हणून रोज रोज भरपूर तूप खात असाल तर..
सुखासनाच्या आसनात शरीराचा खालचा भाग आरामशीर अवस्थेत असतो. ज्यामुळे हृदयावरील रक्त पंपिंगचा दाब कमी होतो. पाय रोवून बसून खाल्ल्याने पोटातील रक्ताभिसरण सुधारते. हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आणि होलिस्टिक लाइफ कोच करिश्मा शाह म्हणतात, 'खाली मांडी घालून बसून जेवल्याने पचन सुधारते. खाली बसून जेवताना मेंदूतील वॅगस मज्जातंतू ओव्हरइटिंग करण्यापासून रोखते. ज्यामुळे अतिरिक्त वजन वाढत नाही.'
नोएडास्थित फोर्टिस हॉस्पिटलचे प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसर डॉ. विशाल गुप्ता सांगतात, 'खाली बसून जेवल्याने पचनक्रियेत अडचण येत नाही. पोटाच्या स्नायूंना फायदा होतो. जमिनीवर बसून खाल्ल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. कारण खाली बसून जेवताना आपली कंबर सरळ राहते.'