Join us   

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 1:07 PM

Why you must soak lentils before cooking them : डाळ शिजत घालण्यापूर्वी भिजत घालावी का? याचे आरोग्याला कोणते फायदे मिळतात?

कडधान्य आणि डाळी आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहे (Lentils). आपल्या भारतात विविध प्रकारच्या डाळी मिळतात. डाळी खाण्याचे अनेक फायदेही आहेत. बहुतांश तज्ज्ञ रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात (Pulses). ज्यात मसूर, हरभरा, मूग आणि उडीद डाळ यांचा समावेश आहे. या डाळींना सुपरफूड देखील म्हटले जाते. यात लोह, जस्त, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या आवश्यक पोषक तत्वे आढळतात (Cooking Tips).

मुख्य म्हणजे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Health Tips). पण ही पोषक तत्वे काही कारणास्तव नष्ट होतात. बऱ्याचदा आपली डाळ शिजत घालण्याची पद्धत चुकते. काही जण डाळ आधी पाण्यात भिजत घालतात, आणि मग प्रेशर कुकरमध्ये शिजवतात. पण डाळी शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? डाळी शिजवण्यापूर्वी काही वेळ भिजत ठेवण्याचे फायदे किती? पाहूयात(Why you must soak lentils before cooking them).

डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत का घालावी?

- कोणतीही डाळ शिजवण्यापूर्वी ती भिजवावी म्हणजे शरीराला हानी पोहोचवणारे फायटिक ॲसिड आणि टॅनिन डाळीतून निघून जातात. या दोन्ही घटकांमुळे शरीराला डाळींचा पुरेपूर लाभ मिळत नाही. त्यामुळे कडधान्ये पचणे सोपे होते आणि त्यातील सर्व पोषक तत्वे मिळतात.

- जे लोक डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत घालत नाही, त्यांना डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो. कारण या ॲसिडमुळे डाळी व्यवस्थित पोटात पचत नाही. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.

व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

- डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत घालण्याचे आणखीन एक फायदा म्हणजे, डाळीच्या वरच्या थरावर असलेले ऑलिगोसॅकराइड्स निघून जातात.

- डाळी भिजवण्यापूर्वी कॉम्प्लेक्स शुगर हा घटक पाण्यात विरघळतो आणि बाहेर येतो. हा घटक काढून टाकला नाही तर तो डाळींसोबत पोटात जातो आणि पोटाचे विकार वाढण्याची शक्यता निर्माण होते.

व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

डाळी शिजत घालण्यापूर्वी किती तास भिजत घालावी?

डाळींचा योग्य आणि जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर, शिजत घालण्यापूर्वी चार ते पाच तास भिजत ठेवा.  जेणेकरून डाळीतील पोषक घटक शरीराला मिळतील. शिवाय आरोग्यालाही फायदे मिळतील. 

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सआरोग्य