Join us   

धान्यं-कडधान्य पाण्यात भिजवूनच का शिजवायची याची ५ कारणे, पचन आणि पोषण दोन्हीसाठी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 9:10 AM

Why You Should Always Soak Whole grains before having : खाल्लेल्या अन्नातून जास्त पोषण मिळावे तर आहाराचे काही नियम जरुर पाळायला हवेत...

आपला आहार हा आपल्या आरोग्यातील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण कशाप्रकारचा आहार घेतो, किती प्रमाणात घेतो, कोणत्या वेळेला घेतो आणि शरीराचे पोषण होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपल्या शरीरात जातात का हे पाहणे महत्त्वाचे असते. धान्ये, कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आपण आहारात समावेश करतो. धान्य हा भारतीयांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असतो. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशी विविध प्रकारची धान्ये आपण आहारात घेत असतो. ही धान्ये कशी खावीत याचे काही नियम असतात. त्या पद्धतीने धान्य खाल्ल्यास त्यातून जास्त पोषण मिळते. धान्य खाण्याआधी कायम काही काळ पाण्यात भिजवून ठेवावीत. यामुळे शरीराला या धान्याचा जास्त चांगला फायदा होतो (Why You Should Always Soak Whole grains before having). 

फायदे

१. धान्यांमध्ये फायटीक अॅसिड असते. हे धान्य पाण्यात भिजवून ठेवल्याने फायटीक अॅसिड काही प्रमाणात कमी होते. फायटीक अॅसिड कमी झाल्याने आयर्न, कॅल्शियम यांसारखी खनिजे शरीरात शोषली जाण्यात अडथळा येत नाही. 

२. धान्य भिजवल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. तसेच शरीरात जे अमिनो अॅसिड असतात ते चांगल्या प्रकारे पचतात आणि पचनक्रियेत अडथळे येत नाहीत. 

३. प्रोटीन आणि फायबरचे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी धान्य भिजवण्याचा फायदा होतो. तसेच धान्यावर असणारा स्टार्चचा थर निघून जाण्यासही भिजवल्याने फायदा होतो. 

४. धान्य भिजवल्याने ते शिजण्यास कमी वेळ लागतो आणि त्यामुळे आपला गॅस, एनर्जी आणि वेळ सगळेच वाचते. 

५. धान्य भिजवल्याने ते काही प्रमाणात हलके होते आणि पचायला सोपे जाते. यामुळे पोट जड होण्याच्या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. यामुळे पोट फुगल्यासारखे किंवा गॅसेस झाल्यासारखे वाटत नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नआहार योजना