"अन्न हे पूर्णब्रह्म" मानले जाते. आपण दिवसभरात जे अन्न खातो ते शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढेच नव्हे तर आपले मानसिक आरोग्य आणि मूड्सवर देखील याचा परिणाम होतो. यासाठीच दिवसभरात जे काही अन्न आपण खातो ते खाताना आपला मूड हा चांगला असला पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारचे अन्न खात असताना त्या वेळी आपण कोणत्या मूडमध्ये आहोत हे देखील तितकेच महत्वाचे असते.
काहीवेळा जेवत असताना आपले जेवणाकडे लक्ष नसते, किंवा आपला मूड चांगला नसतो. याचबरोबर काहीवेळा आपण भांडण, राग, चिडचिड करुन जेवणाच्या ताटावर जेवायला बसतो. अशावेळी आपल्या या मूडचा आपल्या जेवणावर आणि एकूणच आपल्या पचन संस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होताना दिसतात. त्यामुळे नेहमीच जेवताना आपला मूड चांगला असला पाहिजे. जेवताना जर आपला मूड चांगला नसेल किंवा आपण राग, चिडचिड, स्ट्रेस घेऊन जेवत असू तर त्याचे आपल्या आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात ते पाहूयात(Why you should never eat food when you are angry or anxious).
जेवत असताना आपला मूड कसा आहे, या मूडचा आणि आपल्या जेवणाचा नेमका काय संबंध असतो, जेवत असताना राग, चिडचिड केल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबत अधिक माहिती देणारा एक व्हिडीओ डॉक्टर शिल्पा अरोडा यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
जेवणाचा आणि आपल्या मूडचा नेमका काय संबंध असतो ?
डॉक्टर शिल्पा अरोरा व्हिडिओमध्ये सांगत आहे की, आपल्या जेवणात फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट आणि कार्ब्स हे योग्य प्रमाणात असावेत. यालाच संतुलित आहार असे म्हटले जाते. यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. परंतु जेवताना जर तुमचे मन शांत आणि आनंदी असेल तरच तुम्ही या सर्व पोषक तत्वांचा शरीरासाठी फायदा करुन घेऊ शकाल. जेवताना राग, चिडचिड स्ट्रेस सगळे बाजूला ठेवून आनंदी होऊन जेवले पाहिजे. असे केल्यानेच समोरच्या ताटामध्ये असलेले सर्व पोषक तत्व शरीरात सहज शोषले जातील. याउलट जर तुम्ही रागात, चिडचिड करून आणि फोनकडे बघत जेवत असाल तर तुमच्या शरीराला तुमचे अन्न पचण्यात अडचण येते. त्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी जेवताना जेवणावरुन लक्ष विचलित होऊ देऊ नका.
वजन कमी करण्यासाठी या ५ पद्धतींनी करा चालण्याचा व्यायाम, फरक दिसेल काही दिवसांत...
संतुलित आहार म्हणजे काय?
जो आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळवून देतो त्यालाच 'संतुलित आहार' असे म्हटले जाते. तुम्हाला आवश्यक असलेले शारीरिक पोषण मिळवण्यासाठी, तुमच्या डेली रुटीनमधील कॅलरीजपैकी बहुतांश कॅलरीज या खालील पदार्थांमधून आल्या पाहिजेत.
१. फळे
२. भाज्या
३. कडधान्य
४. ड्रायफ्रुटस
५. बिया
संतुलित आहार का महत्त्वाचा आहे ?
संतुलित आहार आपल्या शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळवून देतो. योग्य पोषणाशिवाय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग, थकवा आणि बरेच आजार होण्याची शक्यता असते.