निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार, व्यायाम आणि आराम करणं गरजेचं आहे. आपण काय खात आहोत, याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कारण पचन बिघडल्यावर शरीरात अनेक गोष्टी बिघडतात. ज्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही. काही विशेष सवय आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. यातीलच एक सवय म्हणजे जेवल्यानंतर आंघोळ करणे.
काहींना दिवसातून अनेकवेळा आंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय शरीरासाठी घातक ठरू शकते. आयुर्वेदानुसार, जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य नाही. यासंदर्भातील माहिती, आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(Why you should never take a shower right after a meal).
जेवल्यानंतर शरीराचे तापमान वाढते
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'जेवल्यानंतर आपल्या शरीराचे तापमान २ अंशांनी वाढते. त्यामुळे अन्न पचण्यास सोपे जाते. पोटात पचनक्रिया सुरू असताना रक्तप्रवाहही वाढतो. आंघोळ केल्यानंतर शरीर थंड होते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. यासह वजन वाढीची देखील समस्या निर्माण होते.
चहा पिण्यापूर्वी खा या ४ पैकी कोणतीही १ गोष्ट, चहा जास्त प्यायला तरी पित्त वाढणार नाही
आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर आंघोळ का करू नये
आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. यासह रक्ताभिसरणही मंदावते. ज्यामुळे शरीराचे तापमान अचानक असंतुलित होते. अशा वेळी शरीराला अन्नातून योग्य पोषण मिळत नाही. यासह शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात, ज्यामध्ये संधिवात ते त्वचा रोग यांचा समावेश आहे.
आंघोळ केल्यानंतर जेवण करावे का?
आयुर्वेदानुसार जेवण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यासह फ्रेश देखील वाटते. शरीर नॉर्मल टेंपरेचरवर आल्यानंतर आपण जेवण करू शकता.
बदाम-बडीशेप-खडीसाखरेची १ चमचा पावडर रोज खाण्याचे ४ फायदे, उपाय सोपा-लाभ मोठा
जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नये
डॉक्टर जेवल्यानंतर लगेच आंघोळ न करण्याचा सल्ला देतात. किमान २ ते ३ तासानंतरच आंघोळ करावी. जर आंघोळीविना आपण नाश्ता करत असाल तर, ब्रेकफास्ट करण्याच्या एक तासानंतरच आंघोळ करावी.