Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम? ९० टक्के लोक करतात 'ही' चूक; डॉक्टर सांगतात...

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम? ९० टक्के लोक करतात 'ही' चूक; डॉक्टर सांगतात...

Cold Shower VS Hot Shower Which One Is Better (Angholisathi Konte Pani Vaprayche) : अंघोळीसाठी तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्वाचे असते त्याचप्रमाणे पाणी, पाण्याचे तापमान याचाही तब्येतीवर परिणाम होतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:17 AM2023-11-24T10:17:51+5:302023-11-24T10:19:11+5:30

Cold Shower VS Hot Shower Which One Is Better (Angholisathi Konte Pani Vaprayche) : अंघोळीसाठी तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्वाचे असते त्याचप्रमाणे पाणी, पाण्याचे तापमान याचाही तब्येतीवर परिणाम होतो. 

Winter Health Tips Cold Shower VS Hot Shower Which One Is Better : Cold Shower vs hot water which is better for bathing | हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम? ९० टक्के लोक करतात 'ही' चूक; डॉक्टर सांगतात...

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम? ९० टक्के लोक करतात 'ही' चूक; डॉक्टर सांगतात...

हिवाळ्याच्या (Winter Health Tips)  दिवसात तापमान कमी होत जाते. (Anghol kontya panyane karavi) पुढच्या २ ते ३ आठवड्यात थंडीत जास्त वाढ झालेली दिसून येईल. अशात निरोगी राहण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टीं काळजी घेणं महत्वाचे असते. हिवाळ्यात लोक गरम पाण्याने अंघोळ करतात तर काहीजण हिवाळ्याच्या दिवसातही थंड पाण्याने अंघोळ करतात. (Common bathing mistakes avoid in winter season) अंघोळीसाठी तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्वाचे असते त्याचप्रमाणे पाणी, पाण्याचे तापमान याचाही तब्येतीवर परिणाम होतो. 

अशा स्थितीत गरम पाण्याने अंघोळ करणं प्रभावी ठरतं की थंड यात लोकांना कनफ्युजन असते.  आयुर्वेदीक डॉक्टर अभिनव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या दिवसात कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी. जास्त गरम पाणी घेण्यापेक्षा कोमट पाण्याचा समावेश करावा. (Cold Shower VS Hot Shower Which One Is Better) अंघोळ करताना अटॅक येण, शरीर थंड पडणं असे त्रास टाळण्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी.

1) डॉक्टरांच्यामते हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते याशिवाय सर्दी-खोकला यांसारखे आजार होण्याचा धोका कमी असतो. याशिवाय शरीराचे त्रासही कमी होतात. शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्या लोकांना त्वचेचे विकार आहेत त्यांनी गरम पाण्याने अंघोळ करणं टाळायला हवं. 

रोज गळून केस एकदम विरळ झाले? जावेद हबीबच्या ३ खास टिप्स, दाट-लांबसडक होईल केस

2) तज्ज्ञांच्यामते तुम्ही कोणत्याही ऋतूत ताज्या पाण्याने अंघोळ करू शकता. पण पाणी रात्री भरून ठेवलं असेल तर ते जास्त  थंड असू शकता. अशा पाण्याने अंघोळ केल्यास शिंका येणं, घशात-कानात इरिटेशन, खाज येणं हा त्रास जाणवू शकतो.  ज्या लोकांची इम्यूनिटी स्ट्रॉग असते असे लोक  थंड पाण्याने अंघोळ करू शकतात.

3) ज्यांना सतत सर्दी, खोकला होतो, इम्यूनिटी फारच  कमकुवत आहे.  त्यांनी हलकं कोमट पाणी अंघोळीसाठी वापरायला हवं ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही कोमट किंवा ताज्या दोन्ही पाण्यांनी अंघोळ करू शकतात. हे तुमच्या शारीरिक आरोग्यावर अवलंबून असते. याबाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.  

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

4) दिवसभरातून दोनवेळा अंघोळ करायलाच हवी. अंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही चिमुटभर सैंधव मीठ घातले तर थकवा निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय मांसपेशींनाही आराम मिळेल, तुम्ही या पाण्यात तुरटीचा खडाही मिसळू शकता. तुरटी मिसळून अंघोळ केल्यास शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते. 

Web Title: Winter Health Tips Cold Shower VS Hot Shower Which One Is Better : Cold Shower vs hot water which is better for bathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.