Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय

थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय

Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : हा काढा कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे होतात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 05:21 PM2022-11-08T17:21:23+5:302022-11-08T17:26:30+5:30

Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : हा काढा कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे होतात याविषयी...

Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : Drink 'special' herbal tea when you wake up in the cold morning; Experts say it's the perfect solution to problems ranging from hair loss to diabetes | थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय

थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय

Highlightsसकाळी उठल्या-उठल्या चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा घरगुती गोष्टींपासून केलेला हर्बल टी केव्हाही फायदेशीर ठरतो.त्वचा-केस, डायबिटीस, थायरॉईड, रक्तदाब यांसारख्या विविध समस्यांवर उपयुक्त असलेला हा काढा नक्की ट्राय करा

थंडी म्हणजे तब्येत ठणठणीत ठेवायचा कालावधी. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गज्य आजारांचे प्रमाण थंडीच्या दिवसांत कमी होते आणि मोकळी हवा असल्याने या काळात अन्न चांगले पचते. मात्र तरीही या ऋतूमध्येही केस गळण्यापासून ते अगदी बद्धकोष्ठतेपर्यंतच्या काही ना काही समस्या भेडसावतातच. वाढलेली शुगर, हार्मोन्सचे असंतुलन, मायग्रेन, वजन वाढ अशा एक ना अनेक समस्या कुटुंबातील व्यक्तींना भेडसावतच असतात. अशावेळी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हर्बल टी करुन प्यायल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार आपल्याला एक अतिशय सोपा आणि उपयुक्त असा काढा सांगतात. ज्याचा आपल्याला थंडीत आणि आरोग्याच्या विविध समस्यांसाठी अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. हा काढा कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे होतात याविषयी (Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar)...

काढा कसा करायचा? 

१. २ ग्लास पाण्यात ७ ते १० कडीपत्त्याची पाने आणि ३ ओव्याची पाने घालून हे सगळे गॅसवर उकळायला ठेवायचे. 

२. १ चमचा धणे, १ चमचा जीरे आणि १ वेलची, १ इंच आल्याचे तुकडे घालायचे.

३. हे सगळे मिश्रण साधारण ५ मिनीटे गॅसवर तसेच उकळत ठेवायचे. 

४. त्यानंतर गाळून हा काढा प्यायचा. 

आरोग्यासाठी फायदे

१. हा १०० मिलीलीटर काढा लिंबाचा रस घालून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

२. कडीपत्ता केसगळती कमी होण्यासाठी, शुगर नियंत्रणात राहण्यासाठी आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

३. ओव्याची पाने पचनाशी निगडीत तक्रारींवर, सर्दी-कफ तसेच डायबिटीस, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

४. धणे हार्मोन्सचे असंतुलन, मायग्रेन आणि थायरॉईडसारख्या तक्रारींवर उपयुक्त ठरतात. 

५. जीरं फॅटस कमी होणे, अॅसिडीटी, मायग्रेन यासाठी फायदेशीर असते. 

६. वेलचीचा नॉशिया, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, त्वचा आणि केस चांगले ठेवणे यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. 

Web Title: Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : Drink 'special' herbal tea when you wake up in the cold morning; Experts say it's the perfect solution to problems ranging from hair loss to diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.