Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती

हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती

Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : चहाला पर्याय असलेल्या या काढ्यामध्ये काय घातले आहे आणि हा काढा कसा करायचा ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 03:40 PM2022-11-23T15:40:00+5:302022-11-23T16:20:58+5:30

Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : चहाला पर्याय असलेल्या या काढ्यामध्ये काय घातले आहे आणि हा काढा कसा करायचा ते पाहूयात...

Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : Instead of tea on cold days, take 1 super drink, experts say, with one health benefit | हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती

हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती

Highlightsकफ दूर होण्यासाठी, हृदय आणि मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आल्याचा चांगला उपयोग होतो. चयापचय क्रिया सुरळीत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त असते.

ऋतूनुसार आपण आहारात बदल करतो. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारा आहार घेतो तर पावसाळ्यात पचायला हलका आहार घेतो. तेच थंडीच्या दिवसांत आपण शरीरातील उष्णता टिकून राहील असा आहार घेणे पसंत करतो. थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान योग्य राहावे यासाठी आपण आहारात काही खास बदल करतो. थंडीत सुकामेवा, गूळ, तीळ, बाजरी, फळं, भाज्या यांचा आहारात भरपूर समावेश करायला हवा हे आपल्याला माहित असते. मात्र त्याबरोबरच या काळात आहारात आणखी काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. प्रसिद्ध स्पोर्टस आहारतज्ज्ञ निधी गुप्ता फिटनेस कोच असून त्या आहाराबाबत नेहमी महत्त्वाचे सल्ले देत असतात. नुकतीच त्यांनी थंडीच्या दिवसांत आवर्जून घ्यायला हवा असा एक काढा सांगितला आहे. चहाला पर्याय असलेल्या या काढ्यामध्ये काय घातले आहे आणि हा काढा कसा करायचा ते पाहूयात (Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips)...

(Image : Google)
(Image : Google)

१. रात्री झोपताना पाण्यात ज्येष्ठमध, आल्याचा तुकडा आणि दालचिनीचा तुकडा भिजत घालायचा. 

२. सकाळी उठल्यावर हे सगळे एका पातेल्यात काढून गॅसवर चांगले उकळायचे. 

३. उकळलेले हे पाणी चहाप्रमाणे प्यायचे. 

४. दुपारच्या चहाच्या ऐवजीही ३ ते ४ तास हे घटक पाण्यात भिजवून तुम्ही घेऊ शकता. 

फायदे 

१. आलं 

आल्यामध्ये जिंजेरॉल नावाचा एक घटक असतो. यामुळे जठराशी निगडीत समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंटस, डायबिटीस नियंत्रणात ठेवणारे, जळजळ कमी करणारे, कॅन्सर रोखणारे घटक असतात. इतकेच नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. तसेच कफ दूर होण्यासाठी, हृदय आणि मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

२. दालचिनी

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास दालचिनी फायदेशीर असते. चयापचय क्रिया सुरळीत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त असते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी, कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो. 

३. ज्येष्ठमध 

श्वसन आणि पचनाचे विकार दूर करण्यास उपयुक्त, तणाव आणि नैराश्य कमी करते, कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. रोग प्रतिकारशक्ती वाढवते, यकृत निरोगी ठेवते, त्वचा विकारांवर फायदेशीर, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि घसा खवखवणे -खोकला यांवर उपयुक्त ठरते. 

 

Web Title: Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : Instead of tea on cold days, take 1 super drink, experts say, with one health benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.