Join us   

बायांनो, स्वतःची काळजी घ्या! उन्हाच्या तडाख्याने पुरुषांपेक्षा महिला जास्त आजारी, उष्माघाताचे बळीही वाढले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 11:56 AM

पुरुषांच्या तुलनेत महिलांना गर्मीचा खूप त्रास खूप जास्त प्रमाणात होतो असं नुकतंच काही अभ्यासांवरून सिद्ध झालं आहे..

ठळक मुद्दे यामुळे महिलाचं आजारपण आणि त्यातून त्यांचा मृत्यूदर या दोन्ही गोष्टी मागील काही वर्षांपासून वाढत चालल्या आहेत. 

उन्हाच्या अतिशय तीव्र अशा झळांमुळे सध्या सगळेच होरपळून निघाले आहेत. अशात ज्यांना घराबाहेर उन्हात जाऊन काम करावं लागतं, अशांचा त्रास तर खूपच वेगळा. अगदी घरातही बसवत नाही असे वातावरण सध्या सगळीकडेच झाले आहे. या वातावरणाचा सर्वाधिक त्रास होतो तो लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना. पण आत त्यांच्याच बरोबरीने महिलांनाही वाढत्या तापमानाचा पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त त्रास होतो आहे, असं एका अभ्यासावरून सिद्ध झालं आहे. (women are suffering from more difficulties than men due to heat and climate change)

 

दि प्रिंट यांनी याविषयी जे वृत्त दिलं आहे, त्यानुसार महिलांना वाढत्या तापमानाचा तसेच वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांचा, तसेच हवेमधील प्रदुषित घटकांचा त्रास पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात होतो.

 

कापूर- तूप एकत्र करा आणि बघा जादू, पिंपल्सपासून ते डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या गायब

यासाठी महिलांचे कपडे, त्यांचं कामाचं स्वरुप या आपल्याकडच्या सांस्कृतिक गोष्टी जशा जबाबदार आहेत तसंच काही बायोलॉजिकल घटकही कारणीभूत आहेत, असं त्या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे महिलाचं आजारपण आणि त्यातून त्यांचा मृत्यूदर या दोन्ही गोष्टी मागील काही वर्षांपासून वाढत चालल्या आहेत. 

 

त्यातही यामध्ये गरोदर महिलांचं आणि वयस्कर महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. या दोन्ही प्रकारात येणाऱ्या महिलांना खूप जास्त गर्मी होते. तसेच दुषित हवेचा परिणामही त्यांच्यावर तुलनेने अधिक प्रमाणात होतो.

सेल डाऊन झाल्यास लगेच फेकू नका- करा एकदम देसी जुगाड, आठवडाभर तरी आरामात चालतील... 

त्यातून त्यांना हृदयाचे विकार, उच्च रक्तदाबाचा त्रास, फुफ्फुसाचे विकार जडणे असे त्रास होत आहेत. यामुळे महिलांचा मृत्यूदर २००५ या वर्षीपासून चढत्या क्रमाने जात आहे, असंही अभ्यासात नमूद केलं आहे.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलासमर स्पेशलउष्माघातहृदयरोग