Join us

' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 12:27 IST

Cervical cancer symptoms: Early signs of cervical cancer: Cervical cancer awareness: Risk factors for cervical cancer: Preventing cervical cancer: Cervical cancer screening: Women’s health in 30s: Cancer risk in 35-year-olds: Cervical cancer prevention tips: Cancer prevention for women: गर्भाशयाचा कर्करोग महिलांना कोणत्या वयात होतो, याची लक्षणे काय जाणून घेऊया.

बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे, जंक फूड, सततचा ताण, स्वच्छता न राखणे यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. महिलांमध्ये आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यापैकी एक कर्करोगाचा आजार. (Cervical cancer symptoms)

सध्या कर्करोग ही एक गंभीर समस्या बनत आहे.(Early signs of cervical cancer) गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यामध्ये महिल्यांच्या गर्भाशयाच्या आतल्या पेशी असामान्यपणे वाढतात.(Risk factors for cervical cancer) त्यातून कर्करोगाच्या पेशी तयार होतात. हा आजार महिलांना कोणत्या वयात होतो, याची लक्षणे काय जाणून घेऊया. 

सतत चिडचिड-थकवा,चक्कर येते? प्रचंड केसगळती? पाण्यात मिसळा २ पदार्थ, अशक्तपणा कमी, येईल ताकद

1. गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?

महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करणाऱ्या पाच कर्करोगांपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. हा कर्करोग मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) या नावाच्या विषाणूमुळे होतो. एचपीव्हीची लागण झालेल्या सर्व महिलांना या आजाराचा धोका असतो. बरेचदा याची लक्षणे फार उशीरा दिसून येतात. त्यामुळे परिस्थिती बिघडलेली असते. परंतु, वेळीच याची लक्षणे आपल्याला ओळखता आली तर यावर योग्य तो उपचार करता येतो. साधारणपणे हा आजार ३५ वर्षानंतर महिलांमध्ये दिसून येतो. 

2. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

वारंवार लघवी होणे, पांढरा स्त्राव, सतत छातीत जळजळ, मासिक पाळीत अतिरक्तस्त्राव, भूक न लागणे, सतत थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटीत वेदना आणि सूज येणे, सतत पाठदुखी आणि योनीमध्ये गाठी तयार होणे यांसारख्या आणखी काही समस्या महिलांमध्ये दिसू लागतात. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

3. गर्भाशयाच्या कर्करोगाची कारणे 

शरीरात एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) विषाणू परसल्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या दिसून येते. यामध्ये आनुवंशिकता हे देखील मुख्य कारण असते. महिलांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक प्रमाणात असतो. इतकेच नाही तर गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा लैंगिक संक्रमित आजार देखील आहे.  

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्त्रियांचे आरोग्यकर्करोगमहिला दिन २०२५जागतिक महिला दिन