ब्रेन स्ट्रोक हा एक जीवघेणा आजार आहे. पण सलूमध्ये हेअर मसाज करताना केस धुताना स्ट्रोक येऊ शकतो यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. (Women suffers beauty parlour stroke) हैदराबादमध्ये सलूनमध्ये हेअर वॉश करताना स्ट्रोक आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केस धुवत असताना या महिलेच्या केसांवर दबाव पडल्यानं स्ट्रोक आला. यालाच ब्यूटी पार्लर सिंड्रोम म्हणतात. (Women suffers beauty parlour stroke know all about it from doctors)
सदर महिलेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाच्या मेंदूच्या उजव्या बाजूला आणि मानेच्या मागच्या बाजूला ब्लो क्लोट आढळून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावरून या महिलेला ब्रेन स्ट्रोक झाला होता, असा अंदाज बांधता येतो. केस धुताना मानेकडे झुकल्यानं शिरा आकुंचन पावल्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाल्याने हा झटका आल्याचे रुग्णालयाचे डॉ. सुधीर यांनी सांगितले.
मसाज करताना अशी घ्या काळजी
न्यूरोसर्जन डॉ. राजेश कुमार यांनी एका हिंदी वेबसाईटला सांगितले की, काही प्रकरणांमध्ये मसाज खूप जलद गतीनं केला जातो आणि या काळात डोक्यावर दबावही टाकला जातो. अशा स्थितीत मेंदूच्या काही मज्जातंतू दाबल्या जातात, त्यामुळे असे घडते. अशी प्रकरणे क्वचितच पाहायला मिळत असले तरी ब्युटी पार्लरमध्ये किंवा साध्या मसाजच्या वेळीही हे घडू शकते. म्हणूनच डोक्याला मसाज करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि मसाज एखाद्या व्यावसायिक व्यक्तीकडूनच करून घ्यावा.
डॉ कुमार स्पष्ट करतात की ब्रेन स्ट्रोकची बहुतेक प्रकरणे वयाच्या 45 नंतर दिसतात, जरी आता तरुणांना देखील या समस्येचा सामना करावा लागत आहे. हा एक प्राणघातक आजार आहे आणि जगभरात ब्रेन स्ट्रोकने ग्रस्त असलेल्या 30 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं दिसून आलं आहे. पक्षाघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत, मात्र स्ट्रोकचे रुग्ण कमी होत नाहीत.
असे पहिले प्रकरण १९९३ मध्ये समोर आले होते. त्यानंतर अमेरिकेतील एका सलूनमध्ये मसाज करणार्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर अशी प्रकरणे अनेक वेळा पाहण्यात आली आहेत, परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे. भारतात अशी प्रकरणे क्वचितच समोर येतात.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं
तीव्र डोकेदुखीसह जीभ जड होणं.
बघायला त्रास होणं.
शरीराचा कोणत्याही भाग अचानक सुन्न होणे.
चालण्यास अडचण.