Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसभराच्या कामानं थकवा वाटतो, अशक्तपणा आलाय? हाडांच्या बळकटीसाठी तज्ज्ञ सांगतात.....

दिवसभराच्या कामानं थकवा वाटतो, अशक्तपणा आलाय? हाडांच्या बळकटीसाठी तज्ज्ञ सांगतात.....

महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हाडांची घनता कमी होते, याला सेकंडरी ऑस्टियोपोरोसिस म्हणतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 05:54 PM2022-09-30T17:54:42+5:302022-09-30T18:25:13+5:30

महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हाडांची घनता कमी होते, याला सेकंडरी ऑस्टियोपोरोसिस म्हणतात.

Women's health : Tips to keep your bones healthy | दिवसभराच्या कामानं थकवा वाटतो, अशक्तपणा आलाय? हाडांच्या बळकटीसाठी तज्ज्ञ सांगतात.....

दिवसभराच्या कामानं थकवा वाटतो, अशक्तपणा आलाय? हाडांच्या बळकटीसाठी तज्ज्ञ सांगतात.....

ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोआर्थरायटिस या महिलांना भेडसावणाऱ्या हाडांच्या दोन प्रमुख समस्या आहेत. ऑस्टियोपोरोसिसमुळे हाडांची घनता कमी होते. वयाच्या 25 व्या वर्षी आपल्या सर्वांमध्ये हाडांची घनता सर्वाधिक असते. याचा अर्थ त्या वयामध्ये आपली हाडे सर्वात जास्त मजबूत असतात. त्यानंतर, हाडांची घनता कमी होऊ लागते. महिला व पुरुष दोघांमध्ये वृद्धत्वामुळे हाडांची घनता कमी होत जाते. ही घट एका विशिष्ट पातळीच्या खाली आली तर त्याला ऑस्टियोपोरोसिस किंवा प्रायमरी ऑस्टियोपोरोसिस म्हणतात. डॉ. अविनाश दाते, कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Tips to keep your bones healthy)

महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हाडांची घनता कमी होते, याला सेकंडरी ऑस्टियोपोरोसिस म्हणतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक महिलेला ऑस्टिओपोरोसिस होतो. हाडांच्या घनतेमध्ये होणारी घट प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. वयाच्या 25 व्या वर्षी तुमच्या हाडांची घनता किती होती, तुम्ही किती सक्रिय होता आणि तुम्ही किती व्यायाम केला यावर ते अवलंबून असते. याशिवाय तुम्हाला रोजच्या रोज किती पोषण मिळते त्यावरही ते अवलंबून असते. काही आजारांमध्ये देखील हाडांची घनता कमी होते.

तरुण वयात देखील ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो का?

काही असामान्य परिस्थितींमध्ये, हाडांची घनता कमी होऊ शकते. कधीकधी शरीरात काही अंतर्गत समस्या असते ज्यामुळे हाडांची घनता कमी होते. व्यायामाचे काही प्रकार देखील हानिकारक ठरू शकतात. 

वयाच्या ३० किंवा ४० व्या वर्षी हाडांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणली जाऊ शकते का?

नियमित व्यायाम, पोषण, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स हे घटक ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करण्यास मदत करू शकतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच, वयाच्या २५ व्या वर्षी हाडांची घनता जितकी जास्त असेल तितकी वृद्धापकाळात ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता कमी असते.

एखाद्या व्यक्तीची हाडांची घनता असामान्य प्रमाणात कमी असल्यास, त्यांनी तपासणी करून घ्यावी आणि तपासणीच्या अहवालांनुसार,  उपचार केले जाऊ शकतात. काही केसेसमध्ये, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते. याचाच अर्थ असा की उपचार हे प्रत्येक केसनुसार विशिष्ट असतात आणि प्रत्येक केसमध्ये बदलतात. व्हिटॅमिन डी आपल्या आतड्यांमधून कॅल्शियम शोषण्यात तसेच ते कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यात देखील मदत करते. म्हणूनच शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी पुरेशी असणे अत्यंत आवश्यक आहे. तसे पाहायला गेल्यास, कॅल्शियमचा ऑस्टिओपोरोसिसशी थेट असा काहीही संबंध नाही.

कॅल्शियम काही हाडांचे मॅट्रिक्स तयार करत नाही परंतु ते मॅट्रिक्सवर जमा होते आणि त्याला मजबूत करते. कॅल्शियम सामान्य हाडांवर तसेच ऑस्टिओपोरोटिक हाडांवर देखील जमा होते. पण त्यामुळे ऑस्टियोपोरोटिक हाडे सामान्य होत नाहीत. कॅल्शियम ऑस्टिओपोरोटिक हाडांना किंचित कमी नाजूक बनवते. पण कॅल्शियम हे शरीराच्या इतर भागांसाठी देखील आवश्यक असते.
रजोनिवृत्तीनंतर, महिलांनी स्वतःच्या आहार, पोषण आणि व्यायामाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे कारण ऑस्टिओपोरोसिस कधीही होऊ शकतो. बऱ्याच महिलांना कमी वयात, खूप लवकर रजोनिवृत्ती आणि हाडे कमकुवत झाल्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकते. 

एखाद्या व्यक्तीला आधीच ऑस्टिओपोरोसिस असल्यास काय करावे?

किरकोळ पडल्याने फ्रॅक्चर होईपर्यंत तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे हे कदाचित कळणार देखील नाही.  ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे इतकी कमजोर बनतात की लहानशा दुखापतीमध्ये देखील फ्रॅक्चर होऊ शकतात. अगदी लहान जखमांमुळे देखील शरीराचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही आणि तसे असल्यास, शरीराच्या कोणत्या भागावर त्याचा परिणाम झाला आहे हे डेक्सा स्कॅनमध्ये शोधून काढता येते. पाठीचा कणा, नितंब आणि मनगटात फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या ठिकाणच्या हाडांची घनता जाणून घेणे आवश्यक आहे.

एकदा निदान झाल्यानंतर, रुग्णाची रक्त तपासणी करणे आवश्यक असते जेणेकरून डॉक्टरांना ऑस्टियोपोरोसिसचे प्रकार आणि कारण कळू शकते. उपचारांच्या मदतीने आपण ऑस्टियोपोरोसिसच्या वाढीची गती कमी करू शकतो आणि काही प्रमाणात तो बराही होऊ शकतो. परंतु रुग्णाची अवस्था गंभीर झाली तर वैद्यकीय देखभाल मिळावी यासाठी रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे जेणेकरून रुग्णावर चोवीस तास जवळून लक्ष ठेवले जाईल आणि तो अधिक चांगल्या प्रकारे लवकर बरा होऊ शकतो पण ऑस्टियोपोरोसिस असो किंवा नसो, नियमित व्यायाम आणि उत्तम पोषण नेहमीच उपयुक्त ठरते.
 

Web Title: Women's health : Tips to keep your bones healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.