बहुतेक स्त्रिया छातीत दुखत असल्याची तक्रार करतात. मात्र, कधी-कधी हे दुखणं इतके वाढते की, स्तनाचा कर्करोग झाला आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. सर्वप्रथम, हे जाणून घ्या की स्तनामध्ये वेदना सहसा स्तनाच्या कर्करोगामुळे होत नाही. याची इतरही अनेक कारणे असू शकतात. या वेदनांची दोन मुख्य कारणे आहेत. प्रथम संप्रेरक पातळी कमी, जास्त होणं दुसरे फायब्रोसिस्टिक स्तन. (Breast pain causes)
फायब्रोसिस्टिक स्तनामुळे, तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका नसतो. परंतु जर तुम्हाला स्तनामध्ये एकाच ठिकाणी दुखत असेल किंवा हे दुखणं कमी होत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. छातीत अचानक का दुखतं? त्याची कारणं काय आहेत? हे माहीत करून घेऊया.
हॉर्मोन्स
मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या पातळीत सामान्यपणे चढ-उतार होत असतात. अशा स्थितीत स्तनावर सूज येऊ लागते आणि वेदना लक्षणीय प्रमाणात वाढतात. ही समस्या वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. मात्र, रजोनिवृत्तीनंतर ही समस्या संपते. हार्मोन्समुळे होणारी ही वेदना मासिक पाळीच्या दोन ते तीन दिवस आधी वाढू शकते. काहीवेळा ते तुमच्या संपूर्ण मासिक पाळीत कायम राहू शकते.
फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट
वयानुसार महिलांचे स्तनही बदलू लागतात. अशा परिस्थितीत, चरबी ऊतींची जागा घेते. या स्थितीत, स्तनामध्ये पुष्कळ वेळा सिस्ट तयार होतात आणि अधिक तंतुमय ऊतक विकसित होऊ लागतात. त्यांना फायब्रोसिस्टिक बदल किंवा फायब्रोसिस्टिक स्तन ऊतक म्हणतात. फायब्रोसिस्टिक स्तनांना गुठळ्या झाल्यासारखे वाटते. मासिक पाळीच्या वेळीही या गाठी मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे अनेक वेळा महिलांना वेदना होतात तर कधी होत नाहीत. याशिवाय स्तनाला सूज येणे, बाळाचे स्तनाग्र अयोग्यरित्या धरून ठेवणे, चुकीचा आहार, शस्त्रक्रिया, औषधे किंवा धूम्रपान हे देखील याचे कारण असू शकते.
उपाय
या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आइस पॅक वापरू शकता. हे दिवसातून दोन ते तीन वेळा लावल्याने वेदना आणि सूज दोन्हीमध्ये आराम मिळतो. रोज आंघोळ करण्यापूर्वी हलक्या कोमट ऑलिव्ह ऑईलमध्ये काही प्रमाणात कापूर मिसळून काही काळ स्तनाची मालिश करावी. तुम्हालाही यातून खूप आराम वाटेल. याशिवाय दोन चमचे कोणतेही सामान्य तेल एरंडेल तेलात मिसळून मालिश केल्यासही खूप आराम मिळतो.
व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 6 च्या सेवनाने देखील स्तनाच्या दुखण्यावर आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रोज व्हिटॅमिन ई कॅप्सूलही घेऊ शकता. याशिवाय, ज्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते, अशा गोष्टी खाव्यात. स्नायूंमुळे होणार्या वेदनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. स्तनांमध्ये तीव्रतेनं वेदना होत असतील आणि अनेक उपाय करूनही जर बरं वाटत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.