Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World AIDS Day : प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच अशा एचआयव्ही-एडसबाबत ५ गोष्टी, पश्चाताप टाळायचा तर

World AIDS Day : प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच अशा एचआयव्ही-एडसबाबत ५ गोष्टी, पश्चाताप टाळायचा तर

World AIDS day every women should know 5 things regarding HIV : या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता गरजेची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 03:26 PM2023-12-01T15:26:19+5:302023-12-01T15:28:18+5:30

World AIDS day every women should know 5 things regarding HIV : या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता गरजेची...

World AIDS Day: 5 things every woman should know about HIV-AIDS to avoid regrets | World AIDS Day : प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच अशा एचआयव्ही-एडसबाबत ५ गोष्टी, पश्चाताप टाळायचा तर

World AIDS Day : प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच अशा एचआयव्ही-एडसबाबत ५ गोष्टी, पश्चाताप टाळायचा तर

एचआयव्ही किंवा एडस हा लैंगिक संबंधातून पसरणारा एक आजार आहे. जगभरात अद्याप या आजारावर ठोस असे औषधोपचार नसल्याने या आजाराच्या रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. असुरक्षित लैंगिक संबंध हे यामागील महत्त्वाचे कारण असून भारतात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. एकाहून जास्त व्यक्तींशी ठेवलेले लैंगिक संबंध हे यामागील एक कारण असून अशा संबंधांनंतर जन्माला आलेल्या मुलांमध्येही जन्मत: एडस होण्याचे प्रमाण भारतात जास्त आहे. अमेरिकेसारख्या देशातही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून येत्या काळात जगभरातील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरणार आहे. हा आजार पसरु नये आणि आपण त्यापासून सुरक्षित राहावे यासाठी महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी महिलांना या आजाराबाबत माहित असायला हव्यात अशा ५ महत्त्वाच्या गोष्टी (World AIDS day every women should know 5 things regarding  HIV )... 

१. कंडोम गरजेचाच

प्रत्येक महिलेने लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा जरुर आग्रह धरायला हवा. यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. यासाठी तुमची अनुवंशिकता, वय, लैंगिक गरज या कोणत्याही गोष्टी मधे येता कामा नयेत. एडससारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी ही अतिशय सोपी आणि महत्त्वाची पायरी आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. महिलांना संसर्गाचा धोका जास्त का? 

लैंगिक संबंधांच्या वेळी महिलांना एचआयव्ही होण्याची शक्यता जास्त असते कारण योनीमध्ये एचआयव्ही संक्रमित वीर्याचा संपर्क जास्त प्रमाणात येतो. तसेच, संबंधांनंतर वीर्य योनीमध्ये बरेच दिवस राहू शकते, याचा अर्थ स्त्रियांना या संसर्गाचे जास्त काळ एक्सपोजर मिळते. त्यामुळे महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. 

३. एचआयव्ही असताना गर्भधारणा झाली तर?

एचआयव्ही पॉझिटीव्ह असताना गर्भधारणा झाली तर औषधोपचार हा उत्तम मार्ग असतो. तसेच उत्तम आहार, जीवनशैली यांमुळेही बऱ्याच गोष्टी साध्य करता येऊ शकतात. गर्भधारणेत एचआयव्हीची औषधे घेतल्यास बाळाला एचआयव्ही होण्याचा धोका १ टक्क्यांपेक्षा कमी असतो. 

४. एचआयव्ही चाचणीच्या खर्चाबाबत

बऱ्याच खाजगी विमा योजनांमध्ये कोणत्याही खर्चाशिवाय एचआयव्ही चाचणी समाविष्ट करणे आवश्यक आहे. मेडिकेअर आणि मेडिकेड सहसा एचआयव्ही चाचणी कव्हर करतात. मात्र आपल्या मेडीक्लेममध्ये ते आहे का याबाबत योग्य ती माहिती घेऊन वेळच्या वेळी ही चाचणी करायला हवी. यासाठी आरोग्य विमा कंपनीशी संपर्क साधायला हवा. अन्यथा बहुतांश सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये ही चाचणी किमान खर्चात उपलब्ध असते. 

(Image : Google)
(Image : Google)

५. एचआयव्ही असणाऱ्या महिलांना मानसिक आधार गरजेचा

एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते.  महिलेची चूक नसताना तिला तिच्या जोडीदाराकडून हा आजार संक्रमित झाला असल्यास त्या महिलेला समुपदेशनाचीही गरज भासू शकते. यासाठी कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी यांनी तिला आधार देणे आवश्यक आहे. एचआयव्ही हा केवळ शारीरिक संबंधांतून होत असल्याने मिठी, हवा, स्पर्श यांतून हा आजार पसरत नाही याबाबत जागरुकता असायला हवी. 

Web Title: World AIDS Day: 5 things every woman should know about HIV-AIDS to avoid regrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.