७ मे हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरातच या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. पुर्वी लहान मुलांमध्ये क्वचितच आढळून येणारा हा आजार आता खूप वाढला आहे. अनेक शाळकरी मुलांना अस्थमा असल्याचे निदर्शनास येते. लहान मुलांमध्ये अस्थमाचा त्रास एवढा का वाढला हा खरोखरच चिंतेचा विषय असून त्यामुळेच तर २०२४ या वर्षीसाठी “Asthma Education Empowers” ही संकल्पना घेऊन जनजागृतीविषयक उपक्रम राबविले जात आहेत (what are the symptoms of asthama in kids). लहान मुलांमधला अस्थमा ओळखणं आजही खूप कठीण जातं. म्हणूनच लहान मुलांमधली अस्थमाची लक्षणं कशी ओळखायची ते बघणं गरजेचं आहे... (how to identify asthama in kids)
लहान मुलांमध्ये दिसून येणारी अस्थमाची लक्षणं
लहान मुलांमध्ये असणारा अस्थमा याविषयी डॉ. पुनम सचदेव यांनी webmd.com ला दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमधील अस्थमाची लक्षणं पुढीलप्रमाणे....
१. वारंवार खोकला येणे. विशेषत: मैदानी खेळ खेळताना, पळताना, रात्रीच्यावेळी, थंड हवेमध्ये किंवा हसल्यानंतर, रडल्यानंतर खोकला येणे.
PCOS चा त्रास होतो- पाळीत पोटही खूप दुखतं? ३ पदार्थ नियमित खा, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.....
२. खेळताना, पळताना दम सारखा दम लागणे आणि श्वास घेण्यासाठी थांबावं लागणे.
३. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शांत झोप न येणे. किंवा झोपेतही खूप जोरात श्वास घ्यावा लागणे.
४. छातीत दुखणे किंवा छातीत कसंतरी होतंय अशी तक्रार मुलांनी करणे.
५. श्वास घेताना, सोडताना प्रत्येकवेळी शिट्टीसारखा आवाज येणे.
६. ताेंड बंद ठेवून घास चावताना अडचण येणे.
लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याची कारणं
१. निमोनिया, सायनर यासारखे आजार होणे.
२. एखाद्या गोष्टीची मुलांना ॲलर्जी असणे आणि ती लवकर लक्षात न येणे
कोणतंच खत न टाकताही झाडाला येतील भरभरून लिंबू, बघा उपाय- लिंबू वेचूनच दमून जाल...
३. खूप जास्त वायू प्रदुषण असलेल्या हवेत वारंवार राहावे लागल्यामुळे.
४. मुलांवर सतत कोणता तरी ताण असल्यास त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.