Join us   

World Brain Day : ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ; तुम्ही कधीच काहीच विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 6:44 PM

World Brain Day 2024: 5 foods you must eat for better brain power : वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? खा ५ प्रकारचे पदार्थ; ब्रेन पॉवर वाढेल..

'ब्रेन है तो गेन है' आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू (Brain Power). जेव्हा मेंदू व्यवस्थित काम करते, तेव्हा शरीरातील इतर अवयव व्यवस्थितरित्या कार्य करतात (Brain Health). त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या शारीरिकसह मानसिक आरोग्य सुधारणे अत्यंत गरजेचं आहे (Brain Foods). अन्यथा मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोकाही वाढतो.

बिघडलेली जीवनशैली, अपुरी झोप, तणाव - नैराश्य या कारणांमुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे स्मरणशक्तीही कमजोर होऊ शकते. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. यासाठी आपण आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी सांगितलेल्या ५ पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे मेंदू तीक्ष्ण होईल(World Brain Day 2024: 5 foods you must eat for better brain power).

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन आढळते. शिवाय यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मही असतात. जे मेंदूच्या रक्तपेशी सुधारतात. ज्यामुळे मेंदूला कार्य करण्यास मदत मिळते.

अनेक वर्षे सुखी संसार करुनही जोडपी घटस्फोट का घेतात? ग्रे डिव्होर्स हे काय नवीनच प्रकरण..

बदाम आणि अक्रोड

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मेंदूचे संरक्षण करतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. यासाठी रोज रात्री बदाम पाण्यात भिजत ठेवा, सकाळी त्याची साल काढून खा. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक ॲसिड नावाचे ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. जे मेंदूच्या कार्याला चालना देतात.

तूप

तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर आरोग्यदायी फॅट्स आढळतात. जे मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर ठरतात. तुपामध्ये ब्युटीरेट नावाचे फॅटी ऍसिड असते. ज्याचा फायदा मेंदूलाही होतो.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्या, विशेषत: पालक आणि मेथीमध्ये व्हिटॅमिन अ, क, ई आणि के, फोलेट, लोह आणि कॅल्शियम आढळते. ही पोषकतत्त्वे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य