Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Brain Tumor Day 2022 : ४ लक्षणं सांगतात ब्रेन ट्यूमरचे धोके; डोके दुखते, चक्कर येते -सतर्क राहा..

World Brain Tumor Day 2022 : ४ लक्षणं सांगतात ब्रेन ट्यूमरचे धोके; डोके दुखते, चक्कर येते -सतर्क राहा..

World Brain Tumor Day 2022 : ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आजही जास्त आहे, त्यामुळे कोणती लक्षणे दिसल्यावर त्वरीत उपचार घ्यावेत याविषयी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 12:56 PM2022-06-08T12:56:45+5:302022-06-08T13:36:24+5:30

World Brain Tumor Day 2022 : ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आजही जास्त आहे, त्यामुळे कोणती लक्षणे दिसल्यावर त्वरीत उपचार घ्यावेत याविषयी.

World Brain Tumor Day 2022: 4 Symptoms Explain the Dangers of Brain Tumors; Be careful | World Brain Tumor Day 2022 : ४ लक्षणं सांगतात ब्रेन ट्यूमरचे धोके; डोके दुखते, चक्कर येते -सतर्क राहा..

World Brain Tumor Day 2022 : ४ लक्षणं सांगतात ब्रेन ट्यूमरचे धोके; डोके दुखते, चक्कर येते -सतर्क राहा..

Highlightsनजर कमकुवत होणे, ऐकायला कमी येणे, विचार करुन बोलता न येणे या समस्या निर्माण झाल्या असतील तर मेंदूवरचा ताबा कमी होत असल्याचे लक्षण आहेब्रेन ट्यूमरसारखी समस्या अचानक गंभीर होते, त्यामुळे सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते

दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर डे म्हणून साजरा केला जातो. हृदयरोग, कर्करोग यांप्रमाणेच मेंदूशी निगडीत असलेला ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार आहे. हा आजार साधारणपणे व्यक्तीला शेवटच्या टप्प्यात लक्षात येतो. मात्र तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणती लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा हे माहित असणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्यातील अनेकांना वारंवार चक्कर येत असते किंवा सतत डोकेदुखी होते. पण उन्हामुळे किंवा शरीरातील एखादा घटक कमी झाल्याने असे होत असेल असा आपला अंदाज असतो. त्यामुळे आपण त्यावर तात्पुरती औषधे घेतो आणि दुर्लक्ष करतो. मात्र सुरुवातीला केवळ चक्कर येण्यापर्यंत मर्यादित असणारा हा त्रास पुढे गंभीर रुप धारण करतो.

(Image : Google)
(Image : Google)

ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूतील उतींची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होते आणि त्यामुळे मेंदूमध्ये गाठ तयार होते. डोक्यात निर्माण होणाऱ्या असामान्य पेशींची निर्मीती म्हणजेच ब्रेन ट्यूमर. हा ट्यूमर काही वेळा कॅन्सरचा असू शकतो किंवा कॅन्सर नसलेलाही असू शकतो. काही ट्यूमर अतिशय वेगाने वाढतात तर काही अगदी हळूहळू वाढत जातात. एकदा हा ट्यूमर वाढला की त्याचे ऑपरेशन करावे लागते. पण हे ऑपरेशन मेंदूशी निगडीत असल्याने ते सोपे नसते. त्यामुळे ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आजही जास्त आहे. या आजाराची असंख्य कारणे असून जीवनशैली, ताण, अनुवंशिकता, कॅन्सर, वाढते वय अशी त्याची काही सामान्य कारणे आहेत. मात्र कोणती लक्षणे दिसल्यावर त्वरीत उपचार घ्यावेत याविषयी. 

१. सकाळी आणि रात्री होणारी तीव्र डोकेदुखी 

ज्यांना सतत डोकेदुखी होते असे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पेन किलर घेऊन ही समस्या तात्पुरती सुटते. मात्र ट्यूमरचा त्रास असेल अशाप्रकारे डोकेदुखई होऊ शकते. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या  चाचण्या आणि उपचार झाल्यास आपला जीव वाचू शकतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. म्हणून डेकेदुखीकडे दुर्लक्ष करु नये. 

२. चक्कर येणे 

काही लोकांना ठराविक वयानंतर सारखी चक्कर येते. चक्कर येण्याची अनेक कारणे असतात त्यापैकी ब्रेन ट्यूमर हेही एक कारण असते. त्यामुळे त्वरीत डॉक्टरकडे जाऊन यावर उपचार सुरू करावेत आणि दुर्लक्ष करु नये. 

३. मळमळ आणि उलटी 

ब्रेन ट्यूमरमुळे रुग्णाला उलटी किंवा मळमळ अशा समस्याही उद्भवतात. उलटी किंवा मळमळ होणे याकडे आपण अगदीच सामान्य समस्या म्हणून पाहतो. पण अस्वस्थ होणे किंवा मळमळल्यासारखे होणे ही मेंदूशी निगडित समस्या असू शकते. वारंवार असा त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य ते उपाय करायला हवेत.

(Image : Google)
(Image : Google)

४. डोळे, कान, तोंड यांच्या समस्या

आपले सगळे अवयव हे मेंदूने दिलेल्या सुचनांनुसार कार्यरत असतात. पण मेंदूकडून सुचना येत नसतील तर हे अवयव योग्य पद्धतीने काम करत नाहीत. एकाएकी नजर कमकुवत होणे, ऐकायला कमी येणे, विचार करुन बोलता न येणे या समस्या निर्माण झाल्या असतील तर मेंदूवरचा ताबा कमी होत आहे हे रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी लक्षात घ्यायला हवे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.   

Web Title: World Brain Tumor Day 2022: 4 Symptoms Explain the Dangers of Brain Tumors; Be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.