Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या

World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या

World Cancer Day - योग्य ती काळजी घेतली तर राहू शकतो कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून दूर, जीवनशैलीत सुधारणा करणे गरेजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 01:17 PM2022-02-04T13:17:26+5:302022-02-04T15:37:47+5:30

World Cancer Day - योग्य ती काळजी घेतली तर राहू शकतो कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून दूर, जीवनशैलीत सुधारणा करणे गरेजेचे

World Cancer Day: 4 Things Reduce Cancer Risk in Women; Be careful in time | World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या

World Cancer Day : 4 गोष्टी कमी करतात महिलांमध्ये कॅन्सरचा धोका; वेळीच काळजी घ्या

Highlightsकर्करोगाबद्दल जनजागृती Cancer awareness करण्यासाठी ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो जीवनशैलीत काही बदल केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते

कर्करोग असं नुसतं म्हटलं तरी आपल्याला धडकी भरते. विविध गंभीर आजारांपैकी एक असलेल्या या आजाराचे प्रमाण गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले आहे. जगभरात मृत्यूचे दुसरे महत्त्वाचे कारण असलेल्या कर्करोगाचे World Cancer Day नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी या आजारामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सर्वच स्तरावर त्रास होताना आपण पाहतो. यामुळे रुग्ण आणि त्याचे संपूर्ण कुटुंब एका विचित्र अवस्थेतून जात असते. कर्करोगाचे निदान लवकर होत नाही कारण त्याची नेमकी अशी काही लक्षणे सांगता येत नाहीत. एकाएकी एखादा भाग दुखायला लागला किंवा त्याठिकाणी नेहमीपेक्षा काही वेगळे वाटले तर डॉक्टर तपासणी करायला सांगतात आणि अचानकच आपल्याला कर्करोग झाला असल्याचे निदान होते. काहीवेळा निदान उशीरा झाल्याने उपचार सुरू केले तरी त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. 

कर्करोग होण्याची अनुवंशिकता, जीवनशैलीतील चुकीच्या पद्धती, व्यसनाधिनता अशी अनेक कारणे असली तरी कर्करोग होऊच नये यासाठी आपण आधीपासून काळजी घेऊ शकतो. जीवनशैलीतील लहानमोठे बदल यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र त्याबाबत योग्य ती माहिती घेणे आणि त्याचा दैनंदिन व्यवहारात अवलंब करणे आवश्यक असते. महिलांमध्येही स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, यांबरोबरच रक्ताचा, हाडांचा, आतड्यांचा कर्करोग यांचे प्रमाण जास्त असल्याचे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन World Cancer Day म्हणून जगभरात साजरा केला जातो. कर्करोगाबद्दल जनजागृती Cancer awareness करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असताना या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहूयात...

(Image : Google)
(Image : Google)

योग्य आणि संतुलित आहार महत्त्वाचा 

आपण नियमितपणे चांगला आणि संतुलित आहार घेतला तर आपण कर्करोगापासून वाचू शकतो असे नाही पण कर्करोग होण्याचा धोका यामुळे काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकतो. त्यामुळे आहारात फळे, सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, डाळी, क़डधान्ये यांचा समतोल असणे आवश्यक आहे. सतत जंक फूड, प्रोसेस्ड फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे, चहा-कॉफी यांचे अतिरीक्त सेवन यामुळे आरोग्याचा विविध तक्रारी निर्माण होऊ शकतात. याबरोबरच तंबाखू, दारु, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळेही विविध कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. त्यामुळे आहाराबाबत योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

पुरेशी झोप घ्यायला हवी 

प्रत्येकाला किमान ७ ते ८ तासांची झोप उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. दररोज पुरेशी झोप मिळाल्यास तुमचे आरोग्य, मूड, स्मरणशक्ती, वजन सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहण्यास मदत होते. झोपण्याच्या वेळा या आठवड्याच्या दिवशी आणि विकेंडला सारख्या असणे गरजेचे आहे. तसेच झोपताना टीव्ही, स्मार्टफोन, टॅब यांचा वापर करणे टाळायला हवे. त्याचा झोपेवर विपरीत परिणाम होत असल्याने या गोष्टींबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

(Image : Google)
(Image : Google)

नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय काळजी 

कर्करोगाचे निदान होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांची आवश्यकता असते. त्वचा, ब्रेस्ट, किडणी, फुफ्फुसे यांसारख्या कर्करोगांसाठी अनेक वैद्यकीय तपासण्या असतात. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे या तपासण्या केल्यास वेळीच निदान करणे सोपे जाते आणि त्याचा पुढील उपचारांसाठी फायदा होतो. त्यामुळे कुटुंबात कोणाला कर्करोग असले किंवा तुम्हाला शरीरात एखाद्या ठिकाणी गाठ असेल, बरेच दिवस दुखल्यासारखे जाणवत असेल तर वेळीच तपासण्या करणे आवश्यक असते. यामुळे लवकर निदान होऊन वेळेवर उपचार होतात आणि जीव वाचण्यास मदत होते. 

व्यसनांपासून दूर राहायला हवे 

घशाचा, तोंडाचा, फुफ्फुसांचा, ब्लॅडर, सर्व्हीक्स, किडणी यांसारख्या कर्करोगांपासून वाचायचे असेल तर व्यसनांपासून दूर राहायला हवे. तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे किंवा दारु पिणे यांसारख्या व्यसनांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि कर्करोग होण्याची समस्या वाढते. त्यामुळे तुम्ही कोणते व्यसन करत असाल तर हळूहळी करत ते व्यसन सोडायला हवे. व्यसने सोडण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध असतात किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण व्यसनांपासून दूर राहू शकतो. 
 

Web Title: World Cancer Day: 4 Things Reduce Cancer Risk in Women; Be careful in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.