Join us   

World Cancer Day : वाढत्या वयात कॅन्सरला लांब ठेवायचंय? जेवणात फक्त एक बदल करा अन् तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 1:24 PM

World Cancer Day : पालेभाज्या अनेक वर्षांपासून निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

आपण ज्या प्रकारच्या वस्तू खातो त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळेच प्रत्येकाला अधिकाधिक पौष्टिक आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अलिकडच्या वर्षांत, लोकांमध्ये गंभीर आरोग्य समस्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर आपण फक्त आपल्या आहारात सुधारणा करू शकलो तर अनेक गंभीर आरोग्य समस्या सहज टाळता येतील. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. (How to prevent cancer)

पालेभाज्या अनेक वर्षांपासून निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्या पालेभाज्या आणि भाज्यांनी समृद्ध आहार घेतल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासह विविध फायदे मिळू शकतात. (How to prevent cancer with food)

मानसिक आरोग्यासाठी गुणकारी

हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्यांचे सेवन मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्येही पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. पालकामध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियमसह अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात.

 थंडीमुळे चेहरा काळपट, कोरडा झालाय? घरच्याघरी स्टेप बाय स्टेप फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा

2016 मधील अभ्यासानुसार पालक अल्झायमर  रोखण्यास मदत करू शकते. त्यात कॅरोटीनोइड्स देखील असतात, जे डोळ्यांच्या आजारांपासून बचाव आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात असे मानले जाते.

कॅन्सरचा धोका कमी होतो

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन कॅन्सरसारख्या रोगाचा विकास कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, यासाठी कोबी हा सर्वात फायदेशीर पर्याय असू शकतो. कोबीमध्ये सल्फोराफेन हे संयुग असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. 2019 चा अभ्यास सूचित करतो की सल्फोराफेन स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेडिएशन थेरपी दरम्यान ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यात देखील हे उपयुक्त आहे.

हृदयरोगाचा धोका टळतो

हिरव्या, पालेभाज्यांमध्ये चरबीचे प्रमाण कमी आणि आहारातील फायबर जास्त असते. याशिवाय फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्सही यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास हृदयरोगाचा धोका 11 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सकर्करोगआरोग्य