Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढलेली शुगर पटकन कमी करायचीये? कधी, किती अन् काय खावे याचा सोपा नियम-निरोगी राहाल

वाढलेली शुगर पटकन कमी करायचीये? कधी, किती अन् काय खावे याचा सोपा नियम-निरोगी राहाल

World Diabetes Day 2023 : डायबिटीसचा आजार झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत  नाही आणि याचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:36 AM2023-11-14T11:36:42+5:302023-11-14T11:41:16+5:30

World Diabetes Day 2023 : डायबिटीसचा आजार झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत  नाही आणि याचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो.

World Diabetes Day 2023 : Best Foods For Sugar Control How to Lower Blood Sugar Naturally  | वाढलेली शुगर पटकन कमी करायचीये? कधी, किती अन् काय खावे याचा सोपा नियम-निरोगी राहाल

वाढलेली शुगर पटकन कमी करायचीये? कधी, किती अन् काय खावे याचा सोपा नियम-निरोगी राहाल

डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आजार असून सायलेंट किलर म्हटले जाते कारण या आजारात सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडीयन डायबिटीजच्या रिपोर्टनुसार भारतात जवळपास १०.१ कोटी लोक डायबिटीसने पिडीत आहेत. (What superstar foods are good for diabetes) डायबिटीसचा आजार झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत  नाही आणि याचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. आज १४ नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे (World Diabetes Day 2023) साजरा केला जातो. या निमित्ताने डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How do You Keep Blood Sugar Under Control)

१) डायबिटीसची लक्षणं काय  आहेत (Diabetes chi lakshane in marathi)

जास्त भूक लागणं, अचानक वजन कमी होणं, हाता-पायांना मुंग्या येणं, थकवा, कमकुवतपणा, त्वचा ड्राय होणं, जखमा भरण्यास वेळ लागणं, जास्त तहान लागणं

काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

२) डायबिटीस नियंत्रणात कसे ठेवावयचे (Sugar Control food in Marathi)

डायबिटीसचे रुग्ण एक हेल्दी जीवन जगू शकत  नाहीत. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधांची आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज असते. डायबिटीसच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करायला हवे.  कारण यातील पदार्थ  हळूहळू रक्तात शुगर रिलीज करतात.

3) किती खाता आणि काय खाता हे फार महत्वाचे असते (Diabetes sathi aahar)

सीडिसीच्या रिपोर्टनुसार तुम्ही किती खाता आणि काय खाता याचा डायबिटीसवर परिणाम दिसून येतो. म्हणूनच काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी CDC चा एक नियम फॉलो करू शकता.  एक उत्तम  आहार डायिबिटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.  तुम्ही आहारात नॉन स्टार्चयुक्त भाज्यांचा समावेश करा जसं की ब्रोकोली, पालक आणि हिरव्या भाज्या. खाण्यात फायबर्सयुक्त पदार्थांचे प्रमाण  जास्त असावे. व्हाईट ब्रेड,  भात, साखर, पास्ता अशा पदार्थांच्या सेवनापासून लांब राहा.

4) शुगर कंट्रोलसाठी हाताचा नियम

हाताचा तळवा-  अन्नाचा अर्धा भाग भाज्या,  पनीर, पौष्टीक पदार्थ यांचा समावेश असावा.

अंगठा- दूध, कडधान्ये, ड्रायफ्रुट्स

एक मूठ- १ कप फळं

एक मूठ-  ड्रायफ्रुट्स

Web Title: World Diabetes Day 2023 : Best Foods For Sugar Control How to Lower Blood Sugar Naturally 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.