Join us   

World Food Safety Day : जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ६ पदार्थ; वेळीच तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 11:45 AM

World Food Safety Day :दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम वेगवेगळी असते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावेळी म्हणजेच 2022 मध्ये या दिवसाची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' (Safer food, better health) अशी ठेवली आहे.

निरोगी जीवनासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. सकस आणि पौष्टिक आहाराशिवाय माणूस लवकर आजारी पडू शकतो. प्रत्येक मानवाला जगण्यासाठी पौष्टिक आणि स्वच्छ अन्नाची गरज आहे. निरोगी आणि चांगल्या दर्जाचे अन्न का महत्त्वाचे आहे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन (World Food Safety Day)  साजरा केला जातो. 

दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम वेगवेगळी असते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावेळी म्हणजेच 2022 मध्ये या दिवसाची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' (Safer food, better health) अशी ठेवली आहे. या निमित्ताने तुम्हाला अशाच काही पॅकेज्ड फूडबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे कॅन्सरसह अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोका माहीत असूनही अनेकजण त्यांचे सेवन करतात. (Know about 6 packaged food that can cause different type of cancer)

१) बंद डब्यातील टोमॅटो

बिस्फेनॉल-ए (बीपीए) प्लास्टीकच्या अन्नाच्या डब्यात आढळते. हे एक धोकादायक रसायन आहे, जे कर्करोग आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. टोमॅटो खूप आम्लयुक्त असतात आणि म्हणूनच ते बॉक्समधील बीपीएची पातळी आणखी वाढवू शकतात. असे पदार्थ खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा..

२) बटाट्याचे चिप्स

बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जेव्हा बटाटे जास्त तापमानात शिजवले जातात तेव्हा रासायनिक ऍक्रिलामाइड तयार होऊ शकते. हे काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरले जाणारे रसायन आहे, जे सिगारेटच्या धुरातही आढळते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, ऍक्रिलामाइडमुळे कर्करोग होऊ शकतो.

३) प्रोसेस्ड मीट

ताजे मांस जगात सर्वत्र उपलब्ध नाही, म्हणून बरेच लोक कॅन केलेला मांस वापरतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने प्रक्रिया केलेले मांस कर्करोगास कारणीभूत अन्नपदार्थ म्हणून सूचीबद्ध केले आहे.

 रोज स्वच्छ दात घासूनही पिवळे दिसतात? दातांवरचा पिवळा थर काढून टाकतील हे ५ पदार्थ

४) डेअरी प्रोडक्ट्स

अर्थात, दुग्धजन्य पदार्थ शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात, परंतु त्यांचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला प्रोस्टेट कर्करोगाचा धोका होऊ शकतो. प्रक्रिया केलेले चीज, फ्लेवर्ड दही, आइस्क्रीम, मिल्कशेक, स्मूदी, मिल्क चॉकलेट, गोड कंडेन्स्ड मिल्क, इत्यादी पॅकेज्ड पदार्थ आहेत जे कर्करोगाचा धोका वाढवतात.

५) ब्रेड

ब्रेड हे जगभर खाल्ले जाणारे अन्न आहे. असे मानले जाते की ब्रेडचे पीठ अधिक लवचिक बनवण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेटचा वापर ब्रेड बनवण्यासाठी केला जातो. अनेक आरोग्य संस्थांनी ब्रेड कर्करोगाचे कारण असल्याचे सांगितले आहे. 

पावसाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी लांब ठेवतील ४ पदार्थ; डॉक्टरांनी सांगितले खास उपाय

६) सॉल्टेड फिश

सॉल्टिंग ही अशीच एक पारंपारिक पद्धत आहे ज्यामध्ये गोष्टी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी प्रक्रिया केल्या जातात. ही पद्धत विशेषतः आग्नेय आशिया आणि चीनमध्ये मासे टिकवण्यासाठी वापरली जाते. दुर्दैवाने या पद्धतीमुळे कर्करोग होऊ शकतो.  

टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्सआरोग्य