Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मंकीपॉक्स संसर्गाचा जगभर धोका वाढला, WHO म्हणते हेल्थ इर्मजन्सी; बघा लक्षणे- कशी घ्याल काळजी?

मंकीपॉक्स संसर्गाचा जगभर धोका वाढला, WHO म्हणते हेल्थ इर्मजन्सी; बघा लक्षणे- कशी घ्याल काळजी?

WHO Decalres Monkepox As A Health Emergency: कोविडनंतर आता WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकीपॉक्स या आजाराला हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केले आहे... (what are the symptoms of monkeypox?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 03:08 PM2024-08-16T15:08:34+5:302024-08-16T15:49:47+5:30

WHO Decalres Monkepox As A Health Emergency: कोविडनंतर आता WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकीपॉक्स या आजाराला हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केले आहे... (what are the symptoms of monkeypox?)

world health organisation gives high alert and decalres monkepox as a health Emergency, what are the symptoms of monkeypox? | मंकीपॉक्स संसर्गाचा जगभर धोका वाढला, WHO म्हणते हेल्थ इर्मजन्सी; बघा लक्षणे- कशी घ्याल काळजी?

मंकीपॉक्स संसर्गाचा जगभर धोका वाढला, WHO म्हणते हेल्थ इर्मजन्सी; बघा लक्षणे- कशी घ्याल काळजी?

Highlightsहे फोड येण्यापासून ते त्यावर खपल्या चढेपर्यंत या आजाराच्या संसर्गाचा धोका आहे. साधारण २ ते ४ आठवडे हे फोड अंगावर असतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ३ ते १५ दिवसांत या आजाराची लक्षणं दिसू लागतात.

वैद्यकशास्त्र कितीही प्रगत असले तरी ठराविक काळानंतर कोणतातरी नवा आजार समोर येतो आणि जगभरात धुमाकूळ उठवतो. कोविडचा त्रास आणि त्याने जगाला कशा पद्धतीने वेठीस धरलं होतं, ते तर आपण नुकतंच अनुभवलं आहे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोविडला 'हेल्थ इमर्जन्सी' म्हणून घोषित केलं होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा मंकीपॉक्स या आजाराला WHO ने 'हेल्थ इमर्जन्सी' म्हणून घोषित केलं असून त्याविषयी अलर्ट दिला आहे. आफ्रिका आणि युरोपमध्ये मंकीपॉक्सचे अनेक रुग्ण आढळले असून प्रवाशांच्या माध्यमातून तो आजार भारतापर्यंत येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (world health organisation gives high alert and decalres monkepox as a health Emergency)

 

२०२२ मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आफ्रिकन देशांमध्ये सापडला होतात. आता या आजाराचा संसर्ग होण्याचा प्रकार थोडा बदलला असून त्याचा नवा स्ट्रेन आता सेक्शुअली ट्रान्समिसिबल आहे.

ग्रेसफुल लुक देणारे बंद गळ्याचे ब्लाऊज! आपल्या कलेक्शनमध्ये हवेच असे ६ सुपरट्रेंडी डिझाईन्स...

हा स्ट्रेन lb नावाने ओळखला जातो. याच आजाराचा Ia स्ट्रेन जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. आफ्रिका सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेंशन यांच्या अहवालानुसार आफ्रिकेत आतापर्यंत या आजाराच्या १७ हजार केसेस समोर आल्या असून त्यापैकी ५१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिकेसहीत १३ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सध्या आढळून आले आहेत.


 

मंकीपॉक्स आजाराची लक्षणं काेणती?

ताप येणे, डोकं दुखणे, अंग दुखणे हे आजाराचं पहिलं लक्षण आहे. यानंतर २ ते ३ दिवसांत अंगावर साधारण मोहरीच्या आकाराचे फोड दिसू लागतात. सुरुवातीला ते चेहऱ्यावर दिसतात आणि नंतर हात, पाय आणि इतर शरीरावर पसरतात.

वैद्य सांगतात 'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध! बघा कसं खावं- नाक गळणं लगेच थांबेल

हे फोड येण्यापासून ते त्यावर खपल्या चढेपर्यंत या आजाराच्या संसर्गाचा धोका आहे. साधारण २ ते ४ आठवडे हे फोड अंगावर असतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ३ ते १५ दिवसांत या आजाराची लक्षणं दिसू लागतात.

किचनमध्ये बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात? ४ सवयी स्वत:ला लावा, घरात झुरळं दिसणारच नाहीत

लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना या आजाराचा जास्त धोका आहे. त्यामुळेच हा आजार आणखी पसरू नये म्हणून ज्यांच्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं दिसतील त्यांना काही काळ तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवावे. 

 

Web Title: world health organisation gives high alert and decalres monkepox as a health Emergency, what are the symptoms of monkeypox?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.