Join us   

World Heart Day 2023 : नियमित खा ४ भारतीय मसाले; हार्ट कायम राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 2:06 PM

4 Indian Spices to reduce high cholesterol beneficial for good heart health World Heart Day 2023 : भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे काही मसाल्याचे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान असतात.

हृदय हा आपल्या शरीराचा आत्मा असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण हृदयाची धडधड चालू असते तोवर आपण जीवंत असतो. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालणे अतिशय महत्त्वाचे असते. कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमद्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि हृदयाच्या कार्यात अडथळा येतो. असे होऊ नये म्हणून वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली ( World Heart Day 2023 : 4 Indian Spices to reduce high cholesterol beneficial for good heart health). 

चरबीयुक्त आहार, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. काहीवेळा ही समस्या अनुवंशिकतेमुळेही उद्भवते. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असून वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे काही मसाल्याचे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान असतात. हे पदार्थ आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर असतात पाहूया...

(Image : Google)

१. दालचिनी

दालचिनीमुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास आणि एचडीएल कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. इन्शुलिन नियंत्रणात राहण्यासाठीही दालचिनी फायदेशीर असल्याने डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना त्याचा चांगला फायदा होतो. पुलाव, मसालेभात, ग्रेव्हीच्या भाज्या, चहा यांसारख्या पदार्थांमध्ये आपण दालचिनीचा वापर करु शकतो. 

(Image : Google)

२. काळी मिरी

मिरपूड ही मसाल्यातील अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. एखाद्या पदार्थात तिखट नको असेल आणि तरीही त्याचा छान चव यावी असे वाटत असले तर काळ्या मिरीचा वापर केला जातो. अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असलेल्या मिरीमुळे वजन कमी होण्यासही चांगली मदत होते. रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी काळ्या मिरीचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

३. लाल मिरची 

आपण पदार्थाला तिखटपणा येण्यासाठी लाल मिरचीची पावडर म्हणजेच तिखटाचा वापर करतो. यामध्ये कॅप्साइसिन असते ज्यात अँटीइनफ्लमेटरी गुणधर्म असल्याने रक्तदाब निंत्रणात राहण्यास याची चांगली मदत होते.

(Image : Google)
 

४. हळद

हळदीमध्ये करक्यूमिन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट, एँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. या सर्व गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच बहुतांश पदार्थांना फोडणी देताना आपण हळदीचा आवर्जून वापर करतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलहृदयरोग