Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अचानक BP हाय झाले हार्ट अटॅक येण्यापासून कसं रोखाल? आधी ५ गोष्टी करा-तब्येत राहील चांगली

अचानक BP हाय झाले हार्ट अटॅक येण्यापासून कसं रोखाल? आधी ५ गोष्टी करा-तब्येत राहील चांगली

World Heart Day 2023 Simple Ways to Control High Blood Pressure : अचानक बीपी हाय झाल्यानंतर  तब्येतीचे त्रास उद्भवू नयेत  यासाठी वेळीच काही उपाय केले तर समस्या टाळता येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 02:14 PM2023-09-28T14:14:14+5:302023-09-28T18:12:40+5:30

World Heart Day 2023 Simple Ways to Control High Blood Pressure : अचानक बीपी हाय झाल्यानंतर  तब्येतीचे त्रास उद्भवू नयेत  यासाठी वेळीच काही उपाय केले तर समस्या टाळता येऊ शकते.

World Heart Day 2023 Simple Ways to Control High Blood Pressure High BP Home Remedy | अचानक BP हाय झाले हार्ट अटॅक येण्यापासून कसं रोखाल? आधी ५ गोष्टी करा-तब्येत राहील चांगली

अचानक BP हाय झाले हार्ट अटॅक येण्यापासून कसं रोखाल? आधी ५ गोष्टी करा-तब्येत राहील चांगली

उच्च रक्तदाब ( High Blood Pressure) म्हणजेच हाय ब्लड प्रेशर ही अशी वैद्यकिय स्थिती आहे ज्यामुळे धमन्यांवर आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही.  रक्तदाब वाढल्याने डोकेदुखी,  छातीत दुखणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चिंता, उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात. (World Heart Day 2023) अचानक बीपी हाय झाल्यानंतर  तब्येतीचे त्रास उद्भवू नयेत  यासाठी वेळीच काही उपाय केले तर समस्या टाळता येऊ शकते. (High Blood Pressure Home Remedy)

हाय बीपीचं लक्षणं

डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, नाकातून रक्त येणं, थकवा, छातीत वेदना, धुसर दिसणं ही लक्षणं दिसून येतात. 

गर्दीपासून दूर या

हाय बीपी झाल्यानंतर सगळ्यात आधी गर्दीतून बाजूला या. कारण बीपी हाय झाल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी असल्यास भिती वाटू शकते. आवाज आणि गर्दीच्या वातावरणामुळे मेंदूत अतिरिक्त प्रेशर तयार होतं. ज्यामुळे हार्ट अटॅकसारख्या गंभीर स्थिती उद्भवू  शकते. 

पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

मोकळ्या हवेत बसा

ताज्या आणि मोकळ्या हवेत बसा किंवा आडवे पडा. एसी किंवा फॅन ऑन करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वासांवर लक्ष केंद्रीत करा.  जेणेकरून घाबरल्यासारखं वाटणार नाही. 

दीर्घ श्वास घ्या

बाहेरच्या मोकळ्या हवेत जाऊन दीर्घ श्वास घ्या. यामुळे ताण-तणाव कमी होईल आणि शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वाढेल याशिवाय हार्ट बीट आणि ब्लड फ्लो नियंत्रणात राहील.

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट 

भरपूर पाणी प्या

श्वास घ्यायला त्रास होत असेल तर १ ग्लास ताजं पाणी प्या. पाणी  गरम किंवा जास्त थंड असू नये.  रुम टेंम्परेचरवर असलेलं पाणी प्या. यात तुम्ही थोडं थंड पाणी घालून प्या. जेणेकरून छातीत जळजळ होणार नाही. 

डोळे बंद करून पडा

जर तुम्हाला उच्च बीपीचा त्रास असेल तुमच्याकडे उपलब्ध असलेली बीपीची औषधं घ्या.  थोड्या वेळासाठी शांतपणे झोपा त्यानंतर बिना साखरेचं आणि बिना मीठाचं ताक प्या.  तुम्ही नारळापाणी किंवा थंड दूध सुद्धा पिऊ शकता. 

Web Title: World Heart Day 2023 Simple Ways to Control High Blood Pressure High BP Home Remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.