Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Kidney Day 2022 : अचानक किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात १० सवयी; आजपासूनच बदला, अन्यथा...

World Kidney Day 2022 : अचानक किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात १० सवयी; आजपासूनच बदला, अन्यथा...

World Kidney Day 2022 : नॉन स्टेरायडल एंटी इंफ्लेमेटरी औषध कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. या औषधांनी वेदना कमी होतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:57 AM2022-03-10T11:57:28+5:302022-03-10T12:24:52+5:30

World Kidney Day 2022 : नॉन स्टेरायडल एंटी इंफ्लेमेटरी औषध कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. या औषधांनी वेदना कमी होतात

World Kidney Day 2022 : World kidney day 2022 date daily habits that can harm your kidney | World Kidney Day 2022 : अचानक किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात १० सवयी; आजपासूनच बदला, अन्यथा...

World Kidney Day 2022 : अचानक किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात १० सवयी; आजपासूनच बदला, अन्यथा...

आज जगभरात जागतिक किडनी दिवस (World Kidney Day 2022) साजरा केला जात आहे यामागचा उद्देश म्हणजे या आजाराबाबत लोकांच्या मनात जागरूकता पसरवणे.  शरीरात इतर अवयवांप्रमाणेच किडनीच्या कार्याची महत्वाची भूमिका असते. शरीरातील विषारी आणि नको असलेले पदार्थ बाहेर काढण्याचं काम किडनीचं असतं. (10 common habits that damage kidney) पाणी, मीठ आणि मिनरल्सचं संतुलन ठेवून अतिरिक्त एसिड किडनी शरीराच्या बाहेर फेकते.  या निरोगी संतुलनाशिवाय नसा, मांसपेशी आणि शरीरातील इतर पेशी व्यवस्थित काम करू शकत नाही.  परिणामी किडनी खराब होते. (World kidney day 2022 date daily habits that can harm your kidney)

पेन किलर औषधांचे अतिसेवन

नॉन स्टेरॉयडल एंटी इंफ्लेमेटरी औषधं कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. या औषधांनी वेदना कमी होतात पण किडनीला नुकसान पोहोचते. जर तुम्हाला आधीच किडनीचा आजार असले तर अशा प्रकारच्या औषधांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

जास्त मीठ खाणं

जास्त मीठयुक्त पदार्थांमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे किडनीचे आजार वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे किडनीचे आजार वाढतात. 

प्रोसेस्ड फूड खाणं

प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियम आणि  फॉस्फरेस असते. यामुळे किडनी आणि  हाडांना नुकसान पोहोचू शकतं

स्वत:ला हायड्रेट न ठेवणं

शरीराला हायड्रेट ठेवल्यानं शरीरातून सोडियम आणि विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. पुरेश्या प्रमाणात पाणी प्यायल्यानं किडनी स्टोनपासूनच बचाव करता येतो. यासाठी दररोज  ३ ते ४ लिटर पाणी प्यायला हवं 

झोप पूर्ण न घेणं

शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी रात्री चांगली झोप घ्या. किडनी फंक्शन स्लिपिंग सायकल यामुळे नियंत्रित राहते. 

जास्त गोड खाणं

जास्त गोड खाल्यानं लठ्ठपणाचा सामना करावा  लागू शकतो. यामुळे ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा धोका वाढतो. म्हणून नेहमीच कमी प्रमाणात  गोड खायला हवं

स्मोकिंग

स्मोकिंग शरीरासाठी नुकसानकारक आहे हे तुम्ही ऐकून असाल. जे लोक स्मोकिंग करतात त्यांच्यात क्रोनिक किडनी आजारांचा धोका दुप्पट असतो. त्यामुळे किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी सिगारेट आणि दारूपासून लांब राहायला हवं.

शारीरिक हालचालींचा अभाव

जास्तवेळ बसून राहिल्यानं किडनीचे आजार वाढण्याचा धोका असतो.  यामुळे लाईफस्टाईलवर चांगला परिणाम होत नाही. शारीरिक हालचालींमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. जे किडनीसाठी चांगले ठरते.

जास्त प्रमाणात  नॉनव्हेज खाणं

एनिमल प्रोटिनमध्ये एसिडचे प्रमाण जास्त असते. जे किडनीसाठी हानीकारक ठरते. यामुळे एसिडोसिस उद्भवू शकतो. एसिडोसिस ही अशी स्थिती आहे त्यात शरीरातील एसिडचा स्तर कमी होत नाही.  

Web Title: World Kidney Day 2022 : World kidney day 2022 date daily habits that can harm your kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.