Join us   

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षणं; वेळीच लक्ष द्या अन्यथा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:30 AM

World Liver Day 2023 : हा दिवस साजरा करण्यामागचं कारण  लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे.  

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो.  हा दिवस साजरा करण्यामागचं कारण  लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे.  लिव्हर पचन, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म आणि शरीरातील पोषक तत्वाचे भंडार आहे. लिव्हर पित्ताचं उत्पादनं वाढवते ज्यामुळे फॅट्स कमी होण्यात मदत होते. (World Liver Day 2023)

यामुळे रक्तातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात ब्लड फ्लो व्यवस्थित राहण्यासाठी लिव्हरचं कार्य सुरळीत असणं फार गरजेचं आहे. अन्यथा शरीरात उर्जा आणि पोषक तत्वाची कमतरता भासते. 

लिव्हरची योग्यपद्धतीनं काळजी घेतली नाही तर ते कमी वयातच डॅमेज होऊ शकतं. यामुळे फॅट लिव्हरची समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत फॅट्सचे प्रमाण अधिक असते. जास्तीत जास्त लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येत नाही. फॅटी लिव्हरची काही लक्षणं चेहऱ्यावरही जाणवतात. त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. 

चेहऱ्यावर सूज येणं

लिव्हरमध्ये  बिघाड झाल्यानं प्रोटीन तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे रक्तप्रवाह आणि तरल पदार्थ बाहेर काढणं कठीण होतं. यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. 

मान काळी पडणं

फॅटी लिव्हरच्या आजारामुळे इंसुलिन रेसिस्टंट वाढू शकते. यामुळे जास्त प्रमाणात इंसुलिन तयार होते. इसेंथेसिस नायग्रिकन्सचे विकार वाढतात. अशा स्थितीत त्वचा आणि मानेचा भाग काळा पडतो. 

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

रोजेशिया

JAAD वर प्रकाशित झालेल्या  संशोधनाननसार रोजेशिया एक स्किनचा आजार आहे. ज्यात त्वचेवर लाल चट्टे पडतात.  तर काहीवेळा पांढरे डागही पडतात. यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होत नाही. पण हे त्वचेच्या आजाराचे संकेत असू शकतात. 

चेहऱ्यावर दाणे येणं

फॅटी लिव्हर डिजीसमुळे पोषक तत्वांवर याचा परिणाम जाणतो. यामुळे झिंकची कमतरता जाणवते. यामुळे त्वचेवर  दाणे येण्याची समस्या उद्भवते. फॅटी लिव्हरच्या आजारात शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यासह त्वचेला खाज सुटू शकते. 

उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर

तुमची त्वचा पिवळी पडू शकते आणि डोळे पांढरे होऊ शकतात. कावीळची लक्षणे शरीराच्या इतर भागात पसरण्याआधी डोळ्यांत आणि चेहऱ्यावर दिसतात. जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा लाल रक्तपेशी तुटू शकतात, ज्यामुळे बिलीरुबिन आणि कावीळ तयार होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स