World Liver Day 2025 : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकींमुळे आजकाल लोक लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचे शिकार होत आहेत. सामान्यपणे असंच समजलं जातं की, केवळ दारू पिणाऱ्या लोकांचंच लिव्हर डॅमेज होतं. पण हा एक मोठा गैरसमज आहे. दारू न पिताही तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं. रोज आपण अशा काही गोष्टी खातो ज्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. अशाच काही गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्ही कमी खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून लिव्हर निरोगी राहील.
मैद्याचे पदार्थ
भरपूर लोक रोज मैद्याचे वेगवेगळे पदार्थ खातात. पण मैदा खाणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक असतो. कारण यात मिनरल्स, फायबर आणि व्हिटामिन्स कमी असतात. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. मैद्या पदार्थ नियमित आणि जास्त खात असाल तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं. अशात आजपासूनच मैद्यापासून तयार पदार्थ खाणं बंद करा.
साखर आणि गोड पदार्थ
साखर भलेही चवीला गोड असेल, पण आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण साखरेमुळे किंवा जास्त गोड पदार्थांमुळे लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. तुम्हाला आधीच लिव्हरसंबंधी काहीही समस्या जाणवत असेल तर डाएटमधून साखर लगेच दूर करा. कारण साखरेमुळे किंवा सारखेच्या पदार्थांमुळे लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
फास्ट फूड - जंक फूड
आजकाल जास्तीत जास्त लोक घरच्या जेवणाऐवजी बाहेरच्या फास्ट फूडला प्राधान्य देतात. बरेच लोक नेहमीच पौष्टिक आहाराऐवजी बर्गर, फ्रेंच फ्राइज, नूडल्स खाण्यााल प्राधान्य देतात. मात्र, हे पदार्थ तुमचं लिव्हर डॅमेज करू शकतात. कारण या पदार्थांमध्ये अनेक केमिकल्स आणि मैदा असतो.
सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स
नेहमीच सोडा किंवा कोल्ड ड्रिंक पिणंही तुम्हाला महागात पडू शकतं. या गोष्टींनी सुद्धा लिव्हर डॅमेजचा धोका असतो. तुम्हाला सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असेल तर लगेच बंद करा. कारण या ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. हेच कारण आहे की, यांच्या सेवनाने लठ्ठपणा आणि शरीरात फॅट वाढण्याचा धोका असतो.
मीठ जास्त खाणं
मीठ जास्त खाल्ल्यानं सुद्धा लिव्हर डॅमेजचा धोका असतो. जास्त प्रमाणात खाल्ल्यानं शरीरात वॉटर रिटेंशन होऊ शकतं. जे शरीरासाठी चांगलं नाही. पॅकेज्ड फूड जसे की, खारे बिस्कीट, चिप्स, स्नॅक्स इत्यादी खाणं टाळलं पाहिजे. यात सॅच्युरेटेड फॅट आणि सोडिअम जास्त प्रमाणात असतं. याने फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणाची समस्या वाढते.
मद्यसेवन
लिव्हर खराब होण्यापासून वाचवायचं असेल तर मद्यसेवन टाळलं पाहिजे. कारण दारूमुळे लिव्हर डॅमेज होतं. इतकंच नाही तर जास्त दारू प्याल तर लिव्हरवर सूजही येते. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दारू बंद करा.