Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Lung Cancer Day : फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा ५ गोष्टी, सांभाळा स्वतःचा श्वास

World Lung Cancer Day : फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा ५ गोष्टी, सांभाळा स्वतःचा श्वास

World Lung Cancer Day Lung Health Care Tips : फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 01:22 PM2022-08-01T13:22:17+5:302022-08-01T13:25:13+5:30

World Lung Cancer Day Lung Health Care Tips : फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याविषयी...

World Lung Cancer Day Lung Health Care Tips: 5 things to remember to keep lungs healthy, take care of your breath | World Lung Cancer Day : फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा ५ गोष्टी, सांभाळा स्वतःचा श्वास

World Lung Cancer Day : फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा ५ गोष्टी, सांभाळा स्वतःचा श्वास

Highlightsलसूण, आलं, हळद यांसारखे इन्फ्लमेटरी पदार्थ आहारात आवर्जून घ्यावेत. या पदार्थांमुळे सूज कमी होण्यास मदत होते फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी नियमितपणे वाफ घेणे आवश्यक आहे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो

दिवसरात्र आपण फुफ्फुसांच्या माध्यमातून श्वासोच्छवासाची क्रिया करत असतो. मात्र या फुफ्फुसांकडे आपण म्हणावे तसे लक्ष देत नाही. शरीरातील एक अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या अवयवाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आपल्या श्वसनावर परीणाम होतो. वायूप्रदूषण, धूम्रपान, विविध रासायनिक पदार्थ, धूळ, गार आणि कोरडी हवा यांमुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये टॉक्सिन्स जमा होतात. ज्यामुळे फुफ्फुसे जड झाल्यासारखी, सूज आल्यासारखी वाटतात. हे त्रास जास्त प्रमाणात झाले तर कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीच दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन (World Lung Cancer Day) साजरा केला जातो. फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. के.जे सोमय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे आयुर्वेद विभागप्रमुख असलेल्या डॉ. स्वप्ना कदम याबाबत काही महत्त्वाची माहिती देतात (Lung Health Care Tips).

(Image : Google)
(Image : Google)

१. म्हणून फुफ्फुसांची काळजी गरजेची...

फुफ्फुसे हे शरीर स्वत: ठेवण्याचे काम करत असल्याने एकूणच फुफ्फुसांची स्वच्छता ही नैसर्गिकपणे होत असते. मात्र फुफ्फुसांमध्ये कफ होऊ नये आणि श्वास घेण्याची क्षमता वाढावी यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. श्वसनमार्ग मोकळा व्हावा आणि फुफ्फुसांची क्षमता वाढावी तसेच सूज असल्यास ती कमी व्हावी यासाठी काय करावे हे डॉ. कदम सांगत आहेत. 

२. वाफ घेणे 

घरा पॅक असेल, सर्दी-कफ झाला असेल तर आपण वाफ घेतो. पण फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी नियमितपणे वाफ घेणे आवश्यक आहे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतोच पण थोडाफार कफ असेलच तर तो पातळ करण्याचे काम वाफेमुळे सोपे होते. यामुळे श्वास घेण्याची क्रिया अगदी सहज होते आणि व्यक्तीला आराम मिळतो. 

३. शिंका किंवा खोकला आल्याने होतात फुफ्फुसे साफ

शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी शिंका, खोकला अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये जमा झालेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर येण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला श्वसनमार्गात काही अडथळे आल्यासारखे वाटत असेल तर तज्ज्ञ शिंक काढण्याचा किंवा खोकण्याचा सल्ला देतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. प्राणायाम करणे 

आपण दिवसाचे २४ तास श्वास घेत असतो. मात्र या क्रियेकडे आपले म्हणावे तसे लक्ष नसते. प्राणायाम करताना आपण मुद्दाम श्वासाकडे, श्वसननलिकेकडे लक्ष देतो आणि मुद्दामहून जास्तीचा श्वास घेतो आणि सोडतो. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक श्वासाच्या माध्यमातून बाहेर पडतात आणि फुफ्फुसांचे कार्य मजबूत व्हायला त्याची मदत होते. 

५. अँटी इन्फ्लमेटरी पदार्थांचे सेवन 

आपल्या श्वसनमार्गाला सूज आली असेल तर श्वास घ्यायला अडचण येते, यामुळे छातीत जडपणा वाटतो. अशावेळी लसूण, आलं, हळद यांसारखे इन्फ्लमेटरी पदार्थ आहारात आवर्जून घ्यावेत. या पदार्थांमुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि फुफ्फुसांचे काम सुरळीत चालण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

Web Title: World Lung Cancer Day Lung Health Care Tips: 5 things to remember to keep lungs healthy, take care of your breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.