Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > संध्याकाळ होताच तुमचंही घर डासांनी भरतं? पावसाळ्यात जीवघेण्या आजारांना लांब ठेवण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

संध्याकाळ होताच तुमचंही घर डासांनी भरतं? पावसाळ्यात जीवघेण्या आजारांना लांब ठेवण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

World Mosquito Day 2021: WHO च्या मते मलेरिया जागतिक पातळीवर 219 मिलियन लोकांना प्रभावित करतो. दरवर्षी ४ लाखांपेक्षा जास्त मृत्यू मलेरियामुळे होतात. दुसरीकडे जवळपास  ४० हजारांपेक्षा जास्त मृत्यू हे डेंग्यूमुळे होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:02 PM2021-08-20T12:02:02+5:302021-08-20T12:10:46+5:30

World Mosquito Day 2021: WHO च्या मते मलेरिया जागतिक पातळीवर 219 मिलियन लोकांना प्रभावित करतो. दरवर्षी ४ लाखांपेक्षा जास्त मृत्यू मलेरियामुळे होतात. दुसरीकडे जवळपास  ४० हजारांपेक्षा जास्त मृत्यू हे डेंग्यूमुळे होतात.

World Mosquito Day 2021: World mosquito day 2021 protect yourself from mosquito bites with these tips this monsoon | संध्याकाळ होताच तुमचंही घर डासांनी भरतं? पावसाळ्यात जीवघेण्या आजारांना लांब ठेवण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

संध्याकाळ होताच तुमचंही घर डासांनी भरतं? पावसाळ्यात जीवघेण्या आजारांना लांब ठेवण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

Highlightsडास चावण्यापासून वाचण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात आसपासच्या भागात पाणी साचून राहते. पाणी साचू म्हणून भांडी, बादल्या, टब वापर झाल्यानंतर उलटे करून ठेवा. संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवल्याने डास आत जाण्यापासून बचाव होईल.

२० ऑगस्टला दरवर्षी जागतिक डास दिवस साजरा केला जातो. हा दिवस ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांना समर्पित केला आहे.  १८९७ मध्ये यांनी  डासांपासून माणासांमध्ये मलेरियाचा आजार पसरतो याचा शोध लावला होता. जागतिक डास दिवस  २०२१ ची थीम "रीचिंग द जीरो मलेरिया टारगेट" ही आहे. डासांमध्ये माणसांपर्यंत आजार पोहोचवण्याची क्षमता असते. दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूसाठी डास जबाबदार असतात. 

WHO च्या मते मलेरिया जागतिक पातळीवर २१९ मिलियन लोकांना प्रभावित करतो. दरवर्षी ४ लाखांपेक्षा जास्त मृत्यू मलेरियामुळे होतात. दुसरीकडे जवळपास  ४० हजारांपेक्षा जास्त मृत्यू हे डेंग्यूमुळे होतात.  सुरूवातीला ताप, डायरिया अशी लक्षणं  जाणवतात. सामान्य समजून दुर्लक्ष केल्यानं डासांमुळे पसरलेले हे आजार वाढत जातात.  म्हणूनच डासांना घरात येण्यापासून रोखलं तरच सुरक्षित राहता येऊ शकतं. 

डास का चावतात?

डास चावल्याने पावसाळ्यात अनेक आजार होतात. दरवर्षी हजारो लाखो लोकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण होते. अस्वच्छ पाणी हे डासांच्या प्रजननाचे मुख्य कारण आहे. या व्यतिरिक्त, गरम आणि दमट हवामान डासांच्या प्रजननाला गती देते. म्हणून, विशेषतः पावसाळ्यात, डास चावण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

कपड्यांची निवड

डासांची पैदास पावसाळ्यात जास्त होते. त्यांच्या समोर, कधीकधी डासांची कॉईलही कुचकामी ठरते. त्यामुळे या दिवसात पूर्ण बाह्यांचे, सैल कपडे घालणे डासांच्या चाव्यापासून बचाव करण्यास मदत करू शकते. या हंगामात बॉडी फिट कपडे घालणे टाळावे, कारण या कपड्यांमध्ये डास तुम्हाला सहज चावू शकतात.

इंसेक्ट स्प्रेचा वापर

जर डास संध्याकाळी घरात शिरत असतील तर तुम्ही डास चावण्यापासून वाचण्यासाठी घरात कीटकांचा स्प्रे वापरू शकता. कोणतेही हानिकारक परिणाम टाळण्यासाठी पॅकवर दिलेली माहिती व्यवस्थित वाचा,

डास पळवण्यासाठी उपाय

नैसर्गिकरित्या डासांपासून लांब राहायचं असेल तर लेमन बाम, तुळस, लॅव्हेंडर आणि मेंहेंदी सारख्या डास प्रतिबंधकाचा  वापर चांगला पर्याय आहे. आपल्या शरीरावर इसेंशियल ऑईल वापरणे देखील फायदेशीर ठरेल. पेपरमिंट, लेमनग्रास, तुळस आणि नीलगिरी ही काही आवश्यक तेलं आहेत जी आपण डासांच्या चाव्यापासून वाचवण्यासाठी वापरू शकता.

साफ सफाई

डास चावण्यापासून वाचण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात आसपासच्या भागात पाणी साचून राहते. पाणी साचू नये म्हणून भांडी, बादल्या, टब वापर झाल्यानंतर उलटे करून ठेवा. तसंच, संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवल्याने डास आत जाण्यापासून बचाव होईल.

लक्षणं ओळखा

कधीकधी डास चावतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. पण जर तुम्हाला डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे आजार टाळायचे असतील तर त्यांची लक्षणे ओळखायला शिका. जेणेकरून तुम्हाला कधीही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करता येतील.

Web Title: World Mosquito Day 2021: World mosquito day 2021 protect yourself from mosquito bites with these tips this monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.