डॉ. प्रीतिश भावसार (प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन)
स्तनांचा आकार हा अनेक महिलांसाठी संवेदनशील विषय असतो. कुणाचा स्तनांचा आकार लहान म्हणून त्यांना संकोच वाटतो तर काहींचा आकार मोठा असतो त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. खूप मोठे स्तन असलेल्या महिलांना विविध शारीरिक विकार होतात. मानदुखी, पाठदुखी, झोपेचा त्रास, त्वचेवर पुरळ असे त्रास होतात. आपल्या मनासारखे कपडे घालता येत नाही. काहींच्या गलिच्छ नजरांचाही सामना करावा लागतो. जाडजूड ब्रा घालून पट्ट्यामुळे खांद्यावर जखमा होतात आणि चट्टे येतात. स्तनांचा आकार वाढवता येतो तसा स्तनांचा आकार कमी करण्याच्याही शस्त्रक्रिया असतात. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीही एक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे.
ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी नेमकी काय असते?
वाढलेले स्तन कमी करण्यासाठी २ पर्याय आहेत. Liposuction, सर्जिकल ब्रेस्ट रिडक्शन असे दोन प्रकार आहेत: वाढलेले स्तन हे जास्त प्रमाणात स्तनाच्या ऊतीशी संबंधित असतात, स्तन अनेकदा ओघळतात. ज्यांचे स्तन मोठे पण मजबूत आहेत ते ओघळत नाहीत. पण कमकुवत झाले तर ओघळतात. खरंतर स्तनाचा आदर्श असा कोणताही आकार नाही. आदर्श स्तनाचा आकार ही एक अतिशय व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. स्तन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तुमच्या सर्जनशी याबद्दल सविस्तर चर्चा केली पाहिजे. साधारणपणे सांगायचे तर, स्तन तुमच्या कंबर आणि नितंबाच्या रुंदीच्या प्रमाणात असावेत. आदर्श कंबर-बस्ट गुणोत्तर ०.७ (०.६ ते ०.९ दरम्यान) आहे. काही स्त्रिया विचारतात की माझे स्तन कमी होण्याचे परिणाम काय होतील? मध्यमवयीन स्त्रिया ज्यांनी त्यांचे बाळंतपण झाले आहे त्यांच्यामध्ये स्तन कमी केल्याने दीर्घकाळ टिकणारे आणि जवळजवळ कायमचे परिणाम दिसून येतात. वृद्धत्वामुळे होणारे बदल अपरिहार्य आहेत आणि या प्रक्रियेद्वारे ते टाळता येत नाहीत. मात्र शस्त्रक्रियेनंतर स्तनांनी त्यांची स्थिती कायम ठेवता येथे. तथापि, कालांतराने ते ओघळू शकतात. फिटनेस, व्यायाम, यावरही काही गोष्टी अवलंबून असतात.
स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करताना काय लक्षात ठेवावं? स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचे नियोजन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य सर्जन निवडणे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी केवळ प्लास्टिक सर्जन पात्र आहेत. तुम्ही ज्या सर्जनला भेटत आहात तो एमसीएच/डीएनबी प्लॅस्टिक सर्जरी पदवी असलेले योग्य प्लास्टिक सर्जन निवडा. काही काळाने तुमचे स्तन वाढू शकतात. त्यात वजन वाढ, शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा, हार्मोन बदल अशी कारणं असतात. ते तुम्ही सर्जरीपूर्वी माहिती हवं. स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतरही बाळांना सुरक्षितपणे स्तनपान देऊ शकतात. योग्य माहिती घेऊन या शस्त्रक्रियेचा विचार करावा. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.