'किती दिवस झाले रात्री शांतपणे झोपलेलेच नाही...', 'रोज झोपायला उशीर होतो आणि लवकर उठावं लागतं. त्यामुळे झोपच होत नाही...', 'रात्री शांत झोपच लागत नाही...', 'मध्यरात्रीनंतरच झोप येते, तोपर्यंत अजिबात डोळ्याला डोळा लागत नाही.....', अशी आणि यासारखी अर्धवट झोपेविषयीची वाक्ये आपण आपल्या मैत्रिणींकडून नेहमी ऐकत असतो. किंवा बऱ्याचदा आपणही ते स्वत: अनुभवत असतो. पुरुषांपेक्षा महिलांची अशी तक्रार असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिला खूपच कमी वेळ झोपतात. पण खरंतर पुरुषांपेक्षा महिलांनाच झोपेची जास्त गरज असते (women need more sleep than men), असं नुकतंच एका अभ्यासावरून स्पष्ट झालं आहे. (sideeffects of inadequate sleep)
१५ मार्च हा दिवस World Sleep Day म्हणून ओळखला जातो. झोपेचे महत्त्व, अपुरी झोप आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस आहे.
Loughborough University U.K संशोधनानुसार महिलांना जास्त झोपेची गरज आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांना एकावेळी अनेक गोष्टी सांभाळाव्या लागातात. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. यामुळे महिलांना येणारा शारिरीक आणि मानसिक थकवा साहजिकच पुरुषांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे प्रौढ महिलांना रात्री ७ ते ९ तास शांत झोपेची गरज आहे.
पण खूपच कमी महिला एवढी झोप घेऊ शकतात. कारण बऱ्याचदा वेळेचा अभाव असतो तर कधी मेनोपॉजमुळे त्यांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्यांना झोप येत नाही. यालाच Insomnia असं म्हणतात.
भर उन्हाळ्यातही घर वाटेल थंड- हिरवंगार, 'हे' ५ इनडोअर प्लांट्स घरात ठेवा- घराचा लूक बदलेल
याविषयी डॉ. मुरारजी घाडगे यांनी hindustantimes ला दिलेल्या माहितीनुसार Insomnia हा आजार हार्मोन्सचे बदल, ताण, एन्झायटी, चुकीची जीवनशैली यामुळे होऊ शकतो. यासाठी आपल्या आहारात, जीवनशैलीमध्ये काही बदल करून झोप येण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण वारंवार अशी अपुरी झोप येत असेल तर त्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, डिप्रेशन असा त्रास होऊ शकतो.